पुणे : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला अवघे काही दिवस बाकी आहेत. त्यामुळे सर्व पक्षांकडून सुरु असलेल्या प्रचाराला आता रंगत आल्याचे पहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असणाऱ्या पिंपरी-चिंचवडच्या मध्यवर्ती असणाऱ्या पिंपरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आमने सामने आले आहेत. त्यामुळे आता मतदारसंघात दोन्ही गट एमेकांवर काय भाष्य करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे अण्णा बनसोडे तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत यांच्यात मुख्य लढत होत आहे. पिंपरीची लढाई ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेची लढाई आहे.
२००९ आणि २०१९ मध्ये अण्णा बनसोडे त्यानंतर २०१४ मध्ये शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार पिंपरीमधून निवडून आले. एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या शहरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महायुतीमध्ये केवळ पिंपरीची एकमेव जागा मिळाली आहे. त्यांनी विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांना चौथ्यांदा उमेदवारी दिली आहे.
अण्णा बनसोडे यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेऊन पक्षाचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला होता. शिंदे गटाच्या खासदार श्रीरंग बारणे यांनीही उमेदवार बदलला, तर यश मिळेल, असे सांगून अप्रत्यक्षपणे बनसोडे यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला होता. मात्र, तरीही अजित पवारांनी बनसोडे यांनाच पुन्हा उमेदवारी दिली आहे.
हा मतदारसंघ सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेससाठी महत्वाचा असून एकीकडे बनसोडेंना पक्षातील तसेच महायुतीतील घटक पक्षांकडून झालेला विरोध या सर्व राजकीय घडामोडी पहाता अण्णा बनसोडेंना बालेकिल्ला राखता येणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
-वडगाव शेरीत महायुतीला मोठा धक्का; माजी नगरसेविका टिंगरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
-“दिव्यांगासाठी स्वतंत्र विद्यापीठाचा निर्णय घेता आल्याचा आनंद”- चंद्रकांत पाटील
-शरद पवारांची मानसपुत्र वळसे पाटलांच्या मतदारसंघात जंगी सभा; आंबेगावमधून तुफान फटकेबाजी
-मिळकतकरात पुन्हा मिळू लागली ४० टक्के सूट, रासनेंच्या पाठपुराव्याला कसब्याची जनता पोचपावती देणार
-सर्वोच्च न्यायालयाचा शरद पवारांना धक्का; ‘ती’ मागणी मान्य न केल्याने अजितदादांना मिळाला दिलासा