पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कडक आणि शिस्तीचे पालन करणाऱ्या नेत्यांपैकी एक आहेत. तसेच नेहमीच कामात कसर करणाऱ्या अधिकाऱ्यांना वॉर्निंग तसेच कार्यक्रमांमध्ये टवाळपणा करणाऱ्यांना वेळोवेळी तंबी देताना दिसतात. अशातच पिंपरी-चिंचवडमध्ये आज अजत पवारांच्या उपस्थितीत अनेक कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये टाळ्यांऐवजी शिट्ट्या मारणाऱ्यांना अजित पवार चांगलेच संतापल्याचे पहायला मिळाले आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विविध मान्यवरांचा सन्मान केला जात होता. उपस्थित असलेले तरुण शिट्ट्या वाजवत होते. त्यामुळे अजित पवार चांगलेच संतापल्याचे पहायला मिळाले. अजित पवारांना ताबडतोब माइकचा ताबा घेतला, अन् शिट्या मारणाऱ्या तरुणांवर आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले आहे. “हा कार्यक्रम पोलिसांचा आहे. काय चालले आहे. शिट्ट्या कशाला वाजवता, शिट्ट्या वाजऊ नका, मुख्यमंत्री येथे आले आहेत. शिस्त आहे की नाही? आता शिट्ट्या वाजविल्या तर पोलिसांना उचलायला सांगेन”, अशा कडक शब्दात अजित पवारांनी इशारा दिला आहे. त्यानंतर शिट्ट्या बंद झाल्याचे पहायला मिळाले.
पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीचे भूमिपूजन, महापालिकेच्या विविध कार्यक्रमांचे भूमिपूजन, उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होत आहे. चिखली, जाधववाडी येथे होत असलेल्या कार्यक्रमाला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गृह राज्यमंत्री योगेश कदम, महापालिका आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ यावेळी उपस्थित आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘माझी लाडाची पिनू..’ म्हणत शिरीष महाराज मोरेंचे होणाऱ्या पत्नीसाठी डोळ्यात पाणी आणणारे शेवटचे शब्द
-शिंदेंच्या ‘मिशन पुणे’ला ठाकरे देणार टक्कर; पुण्यासाठी आखला खास प्लान, नाराजांना रोखण्यात यश येणार?
-मोठी बातमी: संत तुकाराम महाराजांच्या वंशजाने उचललं मोठं पाऊल; अवघ्या ३०व्या वर्षी संपवलं जीवन