पुणे : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून तयारी सुरु आहे. महायुतीमधील घटक पक्षांमध्ये अनेक जागांवर दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. अशातच आता महसूलमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटलांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर कुरघोड्या करण्यास सुरवात केली असल्याचे बोलले जात आहे.
अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पाकलमंत्री देखील आहेत. पुणे जिल्ह्यातील महसूल कार्यालयांची महसूल मंत्रालयातील विशेष निरीक्षण पथकाकडून अचानक तपासणी करण्याचे आदेश राधाकृष्ण विखे पाटलांनी दिले आहेत. या संबंधीची तपासणी करण्यासाठी विशेष पथक पुण्यात दाखल झाले आहे. या पथकाकडून सुरु असलेली ही तपासणी १६ ऑगस्टपर्यंत करण्यात येणार आहे.
दरम्यान, या तपासणीवेळी ज्या कार्यालयांची माहिती पथकाला विनाविलंब होणार नाही, त्यांना संबंधित माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात पथकाला सादर करावी लागेल. अन्यथा संबंधित माहिती महसूल सहसचिवांकडे मंत्रालयात समक्ष हजर राहून सादर करावी लागेल, असे महसूल खात्याने दिलेल्या आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्यातील कधी कोणत्या भागातील तपासणी?
३० जुलै – पुणे शहर मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्या अधीनस्त सर्व दस्त नोंदणी कार्यालये
३१ जुलै – मावळ, मुळशी
१ ऑगस्ट – खेड-राजगुरुनगर आणि आंबेगाव
२ ऑगस्ट – जुन्नर, उप वनसंरक्षक, जुन्नर (प्रादेशिक)
३ ऑगस्ट – उप वनसंरक्षक, जुन्नर (प्रादेशिक)
५ ऑगस्ट – हवेली, पुणे शहर
६ ऑगस्ट – भोर, वेल्हे
७ ऑगस्ट – बारामती, इंदापूर
८ ऑगस्ट – दौंड, शिरूर
९ ऑगस्ट – सासवड, पुरंदर आणि उपविभागीय अधिकारी शिरूर आणि पुणे शहर
१२ ऑगस्ट – उप वनसंरक्षक, पुणे (प्रादेशिक/ वन्यजीव)
१३ ऑगस्ट – विभागीय वन अधिकारी, पुणे सामाजिक वनीकरण
१४ ऑगस्ट – जिल्हा अधीक्षक/ नगर भूमापन अधिकारी/ उपअधीक्षक भूमी अभिलेख
१६ ऑगस्ट – पुणे शहर जिल्हाधिकारी कार्यालय पुणे व इतर कार्यालये
महत्वाच्या बातम्या-
-मावळच्या जागेवर बाळा भेगडेंचा दावा; अजित पवारांच्या आमदाराची नाराजी, म्हणाले, ‘महायुतीचे वरिष्ठ…’
-महिलांच्या तक्रारी मागे राजकीय वास? आमदार शिरोळेंना शंका, म्हणाले ‘त्या’ लोकांचा हेतू…
-Big Boss Marathi: बिग बॉसच्या घरात सूरज चव्हाण; कसा कमावतो एका दिवसात ८० हजार रुपये?
-लाडकी बहिण योजनेच्या जाहिरातीत संमतीशिवाय फोटो वापरला; महिलेची पुण्यातील भाजप आमदाराविरोधात तक्रार