पुणे : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात लोकसभा निवडणुकीपूर्वी पडलेल्या फुटीमुळे राज्यातील राजकारणाची समिकरणं बदलली आहेत. त्यामुळे राजकारणात काहीसं अलबेलं सुरु आहे. राजकीय इतिहासात पहिल्यांदाच पवार कुटुंबात फूट पडून या कुटुंबातील सदस्य हे एकमेकांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. आगामी निवडणूक आणि पक्षात पडलेली फूट यावरुन राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांंमध्ये तसेच पवार कुटुंबातील सदस्यांमध्ये टीका-टिपण्णी करताना सुरु आहे.
“अजित पवार गटातील काही आमदार भाजपच्या चिन्हासोबत लढण्यासाठी इच्छूक आहेत. मात्र अजित पवार गटातील काही आमदार लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर शरद पवारांकडे येतील”, असा विश्वास शरद पवार गटाचे कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवारांनी व्यक्त केला आहे. रोहित पवारांनी आज हडपसर परिसरातील विकास कामांची पाहणी केली . त्यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले. त्यासोबतच त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.
“राज्यातलं राजकारण पाहून राज्यातली जनता डिस्टर्ब झाली आहे. राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण कलुषित करण्यात येत आहे. हे वातावरण चांगलं करण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही लढा देतो आहोत. अजित पवारांच्या पाठीशी गेलेले अनेक आमदार भाजपच्या चिन्हावर लढण्याचा विचार करताना दिसत आहेत. याचं प्रतिनिधीत्व अजित पवारांबरोबर असलेले नेते करत आहेत, असं चित्र दिसत आहे”, असं रोहित पवार म्हणाले आहेत.
“काही आमदार भाजपच्या चिन्हासोबत लढण्यासाठी इच्छूक आहे आणि काही आमदार लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर शरद पवारांकडे येतील, असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला आहे आणि महत्वाचं म्हणजे येत्या विधानसभेच्या निवडणुकीत आपल्याला वेगळी परिस्थिती पाहायला मिळेल’, असंही रोहित पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-आढळराव राष्ट्रवादीत जाण्याच्या तयारीत; अजित पवारांनी टाळला नामोल्लेख
-“ज्यांच्या नाकाखालून सहकारी निघून गेले त्यांची बरोबरी मोदी, शहांसोबत काय करणार?”
-“घरात लग्नला विभक्त कुटुंबही एकत्र येत, देशात लोकसभा नावाचं लग्न…”- चंद्रकांत पाटील
-अजितदादा, ही अप्रत्यक्ष कबुली तर नाही ना?; अमोल कोल्हेंचं ‘त्या’ टीकेला प्रत्युत्तर
-मित्राला खासदार करायचंय! मुरलीधर मोहोळांनी अनुभवला ‘मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा’