पुणे : पुणे विमानतळाच्या ‘पार्किंग बे’वर गेल्या दिड महिन्यापासून अपघात झालेले विमान उभे होते. त्यामुळे अनेकांची गैरसोय होत होती. मात्र आता अपघातग्रस्त एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाला आता संरक्षण दलाच्या जागेत हलवण्यात आले आहे. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतल्यानंतर अवघ्या २४ तासात सदरील विमान संरक्षण खात्याच्या जागेत ‘पार्क’ करण्याची परवानगी दिली आहे. या विमानाला हलविल्यामुळे पुणे विमानतळावरील ये-जा करणाऱ्या विमानांचा विलंब टळणार आहे.
‘अपघातग्रस्त विमान हटवल्याने याचा मोठा दिलासा पुणेकरांना मिळणार आहे. कोलमडलेले वेळापत्रक पुन्हा जागेवर येईल. १० पैकी १ बे बंद असल्याचा मोठा परिमाण झाला होता. एका दिवसाला एका पार्किंग बेवर ८ ते ९ विमानांची ये-जा होत असते. मात्र बे बंद असल्याने याचा अतिरिक्त ताण इतर ९ बेवर आला होता आणि याचमुळे वेळापत्रक कोलमडले होते’ असे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले आहे.
Damaged Air India Aircraft at Pune airport moved from parking bay
Air India’s plane which met with an accident at Pune International Airport resulting in blocking of a parking bay has now been moved to the adjacent Indian Air Force area.
Many thanks to Hon Defence Minister…
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) June 27, 2024
‘आम्ही अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष पार्किंग बेवर पाहणी केल्यानंतर संरक्षण खात्याच्या जागेत सदरील विमान पार्क करण्याचा पर्याय समोर आला. म्हणूनच तातडीने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना पत्र पाठविले आणि भेटही घेतली. भेटीच्या २४ तासाच्या आतच ही कार्यवाही झाल्याने पुणेकर प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. तातडीने निर्णय घेतल्याबद्दल संरक्षण सिंह यांचे पुणेकरांच्या वतीने धन्यवाद मानतो’, असे मोहोळ म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पुणेकरांनो सावधान! डासांपासून सावध रहा; शहरात सापडला झिकाचा तिसरा रुग्ण
-महाराष्ट्रातील ‘या’ 8 आमदारांनी दिले राजीनामे; वाचा नावे
-‘महायुतीत खडकवासल्याची जागा शिवसेनेला हवी’, शिंदेंच्या शिलेदाराने थोपटले दंड; नेमकं गणित काय?