पुणे : बारामती लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे यांनी भरघोस मतांनी विजय मिळवला असून १ लाख ८ हजार ४९० मतांचे लीड घेत विजय मिळवला आहे. बारामतीच्या लेकीने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा त्यांनी दारुण पराभव केला आहे. बारामतीच्या विजयानंतर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांना डिवचलं आहे.
रोहित पवार यांनी X या सोशल मीडिया अकाउंटवर एक ट्विट करत अजित पवारांवर निशाणा साधला आहे. ‘काही नेत्यांना वाटतं की नवीन पिढीला नेता बनण्याची घाई झालीय, पण त्यांना सांगायचंय की, नेता बनण्याची घाई नाही तर सध्या ज्या खालच्या पातळीला राजकारण गेलं त्याचा स्तर सुधारण्याची मात्र नक्कीच घाई झालीय!’, असे रोहित पवार आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.
🚩✌️#बच्चा बडा हो गया!
काही नेत्यांना वाटतं की नवीन पिढीला नेता बनण्याची घाई झालीय; पण त्यांना सांगायचंय की, नेता बनण्याची घाई नाही तर सध्या ज्या खालच्या पातळीला राजकारण गेलं त्याचा स्तर सुधारण्याची मात्र नक्कीच घाई झालीय!
बारामतीत सुप्रियाताईंचा #विजय ✌️हा आदरणीय पवार… pic.twitter.com/4WprsyPkHq
— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 4, 2024
‘रोहित पवार बच्चा आहे, बच्चाच्याबद्दल जास्त बोलायचं नसतं. त्याच्या प्रश्नाला मी उत्तरे द्यावी एवढा काय तो मोठा झालेला नाही. माझे कार्यकर्ते, प्रवक्ते उत्तर देतील’, असे अजित पवार म्हणाले होते. त्यानंतर आता बारामतीत मिळालेल्या विजयानंतर रोहित पवारांनी अजित पवारांना सणसणीत उत्तर दिल्याचे पहायला मिळाले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-#BaramatiResult | ‘गुलाल आपलाच’ म्हणणारे सुनेत्रा पवारांचे बॅनर हटवले
-अजितदादांना काकांविरोधात बंड भोवले; बारामतीत सुप्रिया सुळेंचा १ लाखापेक्षा जास्त लीडने विजय
-पैलवानानं मैदान मारलं: पुण्यात भाजपचे मुरलीधर मोहोळ; धंगेकरांचा दारुण पराभव
-‘काय म्हणता पुणेकर निवडून आलाय मुरलीधर’; थेट काँग्रेस भवनाच्या दारावर पोस्टर लावत धंगेकरांना डिवचलं