पुणे : राज्यात चौथ्या टप्प्याचे मतदान १३ मे रोजी पार पडले. पुणे जिल्ह्यातील पुणे, शिरुर आणि मावळ मतदारसंघाचे मतदान पार पडले. मतदानाच्या १ दिवस आधी पुण्यामध्ये मोठा राजकीय ड्रामा पहायला मिळाला. भाजपकडून पैसे वाटले गेल्याचा गंभीर आरोप करत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी सहकारनगर पोलीस चौकीसमोरच ठिय्या आंदोलन केले. हे आंदोलन धंगेकरांना चांगलेच भोवले.
त्यानंतर महाविकास आघाडी आणि महायुतीचे कार्यकर्ते एकामेकांसमोर ठाकल्याचे पाहायला मिळाले. यामुळे काही काळ सहकारनगर परिसरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने पोलिसांनी या प्रकरणांमध्ये काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता दोन्ही पक्षांकडून जमाव जमा करण्यात आला असताना फक्त महाविकास आघाडीच्याच कार्यकर्त्यांवरती कारवाई का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता.
याच पार्श्वभूमीवर आता भाजपच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांवरती सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भाजपचे पदाधिकारी राजेंद्र शिळीमकर, महेश वाबळे, राष्ट्रवादीचे सुभाष जगताप यांच्यासह २० ते २५ कार्यकर्त्यांवरती हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग करून बेकायदेशीर जमाव जमवला आणि घोषणा दिल्या. तसेच वरील आदेशाचे उल्लंघन करताना मिळून आल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दखल करण्यात आला आहे.
मतदानाच्या आदल्या दिवशी धंगेकर यांनी कार्यकर्त्यांसह सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ठाण मांडले होते. त्या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी काढलेल्या आदेशाकडे दुर्लक्ष करत आंदोलन केल्याने पोलिसांनी आमदार धंगेकर यांच्यासह ३५ ते ४० कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांवरही देखील गुन्हे दाखल झाले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-हजारो कोटींच्या बेटिंग अॅपच पुणे कनेक्शन, ४५ लॅपटॉप, ८९ मोबाइल अन् ४५२ बँक पासबुक; नेमका विषय काय?
-पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, पाणीकपातीचं संकट टळलं? वाचा काय झाला बैठकीत निर्णय
-पुण्यात राज्य शुल्क विभागाची मोठी कारवाई; शहरात बनावट दारुसह इतक्या लाखांचा मुद्देमाल जप्त
-कतरिना कैफ होणार आई..?; कतरिनाच्या ‘त्या’ इन्स्टाग्राम पोस्टची होतेय चर्चा