पुणे : पुणे महानगर क्षेत्रिय प्राधिकरणाने हिंजवडी परिसरातील अनधिकृत पब, बार, रेस्टॉरंट आणि बार यावर कारवाई केली होती. त्यानंतर आता ही पीएमआरडीएने अनधिकृत होर्डिंगवर कारवाईचा मोर्चा वळवला आहे. त्या अनुषंगाने प्राधिकरणाकडून स्थापन केलेल्या स्वतंत्र आकाशचिन्ह विभागाच्या वतीने यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. या कारवाईबाबत निविदा दिली आहे.
शहरातील मुळशी तालुक्यात पहिली कारवाई होण्याची शक्यता आहे. पीएमआरडीएच्या ९ तालुक्यात जवळपास हजारो अनधिकृत होर्डिंग उभारण्यात आलेली आहेत. पीएमआरडीएने काही दिवसांपूर्वी या सर्व तालुक्यात सर्वेक्षण पूर्ण केले. त्यानुसार पहिल्या टप्प्यात १ हजारांच्या आसपास अनधिकृत होर्डिंग, जाहिरातफलक, बोर्ड याची माहिती गोळा केली आहे. त्याबाबत त्यांना नोटीस आणि मंजुरीबाबत अर्ज करण्याचे आवाहन केले होते.
काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने होर्डिंगवर कारवाई होऊ शकली नाही. त्यातच कारवाई संदर्भात निविदा देखील काढता येत नव्हती. मात्र, आता आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर प्राधिकरणाने पुढील कार्यवाही सुरू केली आहे.
पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल यांच्याकडे सध्या पिंपरी-चिंचवड महापालिकेचा कारभार देखील सोपवण्यात आला आहे. त्यामुळे त्यांची अंतिम स्वाक्षरी झाल्यानंतर होर्डिंगवरील कारवाईची प्रक्रिया सुरु होणार आहे. या करावाईला मुळशी तालुक्यातून सुरुवात होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Sushant Singh Rajput : सुशांतच्या आठवणीत अंकिता पुन्हा भावूक, खास दिवशी शेअर केला फोटो…
-Pune Hit & Run: न्यायालयातून महत्त्वाची अपडेट आली समोर, आज नेमकं काय घडलं?
-कांद्याने महायुतीला रडवले! अजित पवारांनी थेटच सांगितलं कुठे गणित चुकलं
-संघाच्या मुखपत्रातून अजित पवारांवर टीका; अजित पवार म्हणाले, ‘लोकशाहीत…’
-पावसाळ्यात दूध पित आहात? होऊ शकते नुकसान, वाचा काय परिणाम होतात?