बारामती : बारामती लोकसभा निवडणुकीच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा बारामती मतदारसंघात जोमाने प्रचार सुरू आहे. सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ महायुतीचे परभणीचे उमेदवार महादेव जानकर यांनी बारामतीमध्ये हजेरी लावली आहे. यावेळी बोलताना त्यांनी सुनेत्रा पवारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
“मी परभणीतून खासदार झालो आहे आणि केंद्रात मंत्रीदेखील होणार आहे. सगळ्या विकास कामांसाठी निधी आणणार आहे. अजित पवारांनी माझा प्रचार केला आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करणं माझं कर्तव्य आहे. त्यासोबतच मी एकदिवस पंतप्रधान होणार आहे”, असंही जानकर म्हणाले आहे.
“माझी परभणीची निवडणूक झाली म्हणून मी बारामतीत आलो आहे. अजितदादांनी मला तिकीट दिले तिकडे माझा प्रचार केला म्हणून मी इकडे प्रचाराला येणं हे माझं कर्तव्य आहे. बारामतीतील सगळं मला माहिती आहे. गावागावात फिरलो आहे. त्यामुळे बारामती काही माझ्यासाठी नवीन नाही. बारामतीनं मला राष्ट्रीय नेता केला”, असं महादेव जानकर म्हणाले आहेत.
“बारामतीकरांनी माझ्यावर खूप प्रेम दिलं आहे. आता बारामतीकरांना सुनेत्रा वहिनींना मतदान करा. सुनेत्रा पवार जिंकून येणं हे माझ्यादेखील प्रतिष्ठेची आहे”, असे महादेव जानकर म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-शरद पवार गटाला मोठा धक्का; मतदानापूर्वी रोहित पवारांचे कट्टर समर्थक अजित पवारांच्या राष्ट्रवादीत
-नाराळाच्या तेलाचे हे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का?
-मोहोळांची ताकद वाढली; अखिल भारतीय मराठा महासंघाकडून जाहीर पाठिंबा
-आढळराव पाटलांसाठी महेश लांडगे यांची रणनीती, भोसरीत जनसंवाद मेळाव्याचा धडाका!