Parineeti Chopra : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा ही नेहमी चर्चेत असते. राघव चड्डा यांचे लग्न अत्यंत शाही पद्धतीने पार पडले. परिणीती आणि राघव यांच्या लग्नाचे काही खास फोटोज आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यानंतर आता राघव चड्डाच्या डोळ्याची शस्त्रक्रिया काही दिवसांपूर्वीच विदेशात झाली आहे.
राघव चड्ढाला डोळ्यांचा अत्यंत गंभीर आजार झाला होता. त्यामुळे राघवची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. राघव आणि परिणीती चोप्रा शस्त्रक्रियेनंतर भारतात परतले आहेत. भारतात आल्यानंतर परिणीती आणि राघवने सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. सिद्धिविनायक मंदिरातील राघव चड्डा आणि परिणीती चोप्रा यांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहेत. यावेळी परिणीती खास लूकमध्ये दिसली आहे.
मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी राघव चड्डा आणि परिणीती चोप्रा हे पोहचले होते. यावेळी पापाराझी यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे न देताच राघव आणि परिणीती निघून गेल्याचे पहायला मिळाले आहे. लग्नापूर्वी राघव आणि परिणीती हे एकमेकांना डेट करत होते. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर परिणीती आणि राघव यांनी लग्न केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-हार्दिक पांड्या-नताशाचं बिनसलं? नताशा स्टॅनकोविकचा सिनेक्षेत्राला ‘रामराम’
-Pune Hit & Run | विशाल अग्रवालच्या अडचणीत वाढ; आणखी २ गुन्हे दाखल करणार
-Health Update : कलिंगड, टरबूज खाल्ल्याने होतेय विषबाधा; खाण्यापूर्वी अशी घ्या काळजी
-दोनदा एफआयआर का? आरोपीला पिझ्झा का? अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली कारणे
-‘हो, त्या रात्री आमदार टिंगरे पोलीस स्टेशनमध्ये आले होते, पण…’; अमितेश कुमार यांनी दिली माहिती