मुंबई : आई-वडिल आपल्या मुलांचे सगळे लाड पुरवत असतात. त्याचबरोबर सर्वसामान्य, गरिब कुटुंबातील पालक आपल्या नशिबी कष्टाचे दिवस आले तसे आपल्या मुलांच्या नशिबी येऊ नये म्हणून त्यांना उच्च शिक्षण देण्यासाठी पालक जीवाचं रान करताना पहायला मिळतात. त्यात काही मुला-मुलींना आपल्या पालकांनी आपल्या शिक्षणासाठी घेतलेल्या कष्टाची जान नसते. तर काही हिरे आपल्या शिक्षणाच्या प्रकाश पाडत असे चमकतात की आई वडिलांचे नाव गाजवतात.
योगेश, तुझा अभिमान आहे.
डोंबिवली पूर्व येथील गांधीनगर मधील गिरनार मिठाई दुकानाजवळ भाजी विकणाऱ्या ठोंबरे मावशींचा मुलगा योगेश चार्टर्ड अकाऊंटंट (C.A.) झाला.
निश्चय, मेहनत आणि परिश्रमांच्या बळावर योगेशने खडतर परिस्थितीशी तोंड देत हे दैदीप्यमान यश मिळवलं आहे. त्याच्या या… pic.twitter.com/Mf8nLV4E61
— Ravindra Chavan (@RaviDadaChavan) July 14, 2024
डोंबिवलीतील अशाच एका मुलाची योगेशची अशीच काहीशी कथा आहे. योगेशची आई डोंबिवली पूर्व येथील गांधीनगरमधील गिरनार येथे भाजी विकते. भाजी विकणाऱ्या या ठोंबरे यांच्या पतीचे निधन झाले, त्यानंतर घराची जबाबदारी नीर ठोंबरे यांच्यावर येऊन पडली. दोन मुले अन् एक मुलगी अशा तिघांचा सांभाळ केला. परिस्थितीशी २ हात करत त्यांनी तिन्ही मुलांचा वाढवलं शिकवलं पण जिद्द सोडली नाही. २५ वर्षे भाजी विक्रीचा व्यवसाय करून मोठ्या मुलाचे आणि मुलीचे लग्न करून दिले. हे करूनही ठोंबरे मावशी थांबल्या नाहीत, त्यांचा लहान असलेला योगेशला आज आईने मोठ्या कष्टाने सीए बनवले आहे.
प्रेरणादायी ! कौतुकास्पद ! https://t.co/bKkQQ3RmK0
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 14, 2024
योगेश सीए झाल्यानंतर तो आपल्या आईला ही आनंदाची बातमी देण्यासाठी थेट मंडईमध्ये आईजवळ पोहचला. यावेळी, मुलाने आईला मारलेली मिठी, आणि त्या माऊलीच्या डोळ्यातून निघालेले आनंदाश्रू पाहून अनेकांचा उर अभिमानाने भरुन आला आहे. आईने घेतलेल्या कष्टाचे योगेशने चांगलेच पांग फेडले आहेत. योगेश आणि त्याच्या आईचा अनेकांच्या डोळ्यातून अश्रू आणणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ट्वीट केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: आता वारकऱ्यांनाही मिळणार पेन्शन; राज्य सरकारची मोठी घोषणा
-अजित पवारांच्या लाडकी बहिण योजनेबाबतच ‘ते’ वक्तव्य ठरु शकतं विधानसभेसाठी धोक्याचं!
-महाराष्ट्र सरकार उचलणार तीर्थ दर्शनाचा खर्च; ज्येष्ठांसाठी काढली ‘ही’ नवी योजना
-पुणेकरांनो काळजी घ्या! झिका व्हायरस पसरतोय, डेंग्यूची रुग्णसंख्याही झपाट्याने वाढतेय
-पुणेकरांनो सावधान! झिका वाढतोय, शहरात रुग्णांचा आकडा १९ वर; वाचा सर्वात जास्त धोका कोणत्या भागात?