पुणे : पुणे शहरामध्ये काही काळाची विश्रांती घेत पुन्हा संततधार पावसाला सुरवात झाली आहे. पुढील २ ते ३ दिवस पुन्हा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान खात्याने पुणे शहराला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. राज्यात मोसमी पावसाचा जोर पुन्हा वाढणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.
राज्यात जुलै महिन्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पुणे शहरासह जिल्ह्यातील घाटमाथ्यावर अति मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मोठा पाऊस होत असून पुणेकरांचा वर्षभराचा पाण्याचा प्रश्न तर मिटला आहे. पुणे पुणे जिल्ह्यातील पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा झाला आहे.
दरम्यान, राज्यातील कोकण किनारपट्टी, घाटमाथा, विदर्भात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. घाटमाथ्यावर मध्यम ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. किनारपट्टीवरील हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अरबी समुद्रातून वेगाने बाष्पयुक्त वारे किनारपट्टीवर येत आहे. वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे किनारपट्टीसह पश्चिम घाटमाथ्यावर पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Hadapsar: लोकसभेच्या विजयाने महाविकास आघाडीची गाडी जोरात, महायुतीत उमेदवारीवरून रस्सीखेच
-मावळच्या जागेवर बाळा भेगडेंचा दावा; अजित पवारांच्या आमदाराची नाराजी, म्हणाले, ‘महायुतीचे वरिष्ठ…’
-महिलांच्या तक्रारी मागे राजकीय वास? आमदार शिरोळेंना शंका, म्हणाले ‘त्या’ लोकांचा हेतू…
-Big Boss Marathi: बिग बॉसच्या घरात सूरज चव्हाण; कसा कमावतो एका दिवसात ८० हजार रुपये?