शिरुर : शिरुर लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांना उमेदवारी मिळणार आहे. मात्र महायुतीचा उमेदवार कोण असणार याबाबत अद्यापही ठरलेला नाही. त्यातच शिरुरमध्ये इच्छुक असणारे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ‘लोकसभेच्या निवडणुकीसाठी हाताला घड्याळ बांधणार असलो तरीही माझ्या हातात शिवबंधन कायम बांधलेलं असेल’, असं म्हणाले आहेत. पक्षप्रवेशापूर्वी आढराव पाटलांनी विविध मुद्यांवरदेखील भाष्य केलं आहे.
“महाविकासआघाडी सरकारच्या काळात मी अजित पवारांवर नव्हे तर उद्धव ठाकरेंवर टीका करायचो. आजचा प्रवेश ही घरवापसी अथवा लोकसभेच्या अनुषंगाने पर्याय नाही. तर नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी हे आम्ही उचलेलं पाऊल आहे. अमोल कोल्हेंना पराभूत करण्याचं अजित पवारांनी दिलेलं आव्हान मी माझ्या खांद्यावर उचललं आहे”, असा विश्वास शिवाजीराव आढळराव पाटलांनी व्यक्त केला आहे.
“शिरुरची जागा मिळवण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरु होते. अजित पवार महायुतीत सामील होण्याआधीपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मला सांगितलं होतं की शिरुर मतदारसंघात काम सुरु करा, आपल्याला मतदारसंघ जिंकायचा आहे. तेव्हापासून पायाला भिंगरी लावून मतदारसंघाचं काम करतोय. काम करण्यासाठी महायुतीच्या सरकारने प्रचंड बळ दिलं. विकास निधी दिला. सर्व प्रकारचं सहकार्य केलं”, असंही आढळराव पाटील म्हणाले आहेत.
२००४ साली राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला. २० वर्ष शिवसेनेच्या माध्यमातून काम केलं. त्यानंतर आता पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश घेणार आहात ही घरवापसी आहे का?, असं विचारल्यावर “ही घरवापसी नाही आणि मी पक्ष बदलणाऱ्यातला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. २०वर्ष धनुष्यबाणाशी प्रामाणिक आहे आणि राष्ट्रवादीत प्रवेश करेपर्यंत प्रामाणिक राहिलो”, असंही आढळराव पाटील म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-Summer | पुण्यात उष्णतेचा तडाका वाढला, पारा ४१ डिग्रीच्यावर; अशी घ्या काळजी
-बारामतीसाठी महायुतीकडून महादेव जानकरांना उमेदवारी? अजित पवारांची पुण्यात महत्वाची बैठक
-पुण्यात घर खरेदीची संख्या वाढली; पुणेकरांची ‘या’ घरांना सर्वाधिक पसंती
-नर्सच्या हलगर्जीपणा नडला, रुग्णांना पोहचवलं थेट ICU मध्ये; आश्विनी जगतापांनी दिले कडक कारवाईचे आदेश