पुणे : शिरुर लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात मुख्य लढत होणार आहे. शिरुर मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोमाने प्रचार सुरु आहे. या पार्श्वभूमीवर जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना आढळराव पाटलांनी निवडून आणण्याची शपथ घेतली आहे.
जुन्नर येथे प्रचार करत असताना आढळराव पाटील हे भाजप नेत्या आशा बुचके यांच्या घरी गेले होते, यावेळी अतुल बेणके, सोनवणे, काळे आदींसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी चहापान केला.
चहापानानंतर आढळराव पाटील घरातून बाहेर पडण्यापूर्वी या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या हातात हात घेत ‘हम सब साथ है’ अशा घोषणा दिल्या. “आढळराव पाटील यांना आम्ही पाठिंबा दिला असून त्यांना खासदार म्हणून लोकसभेत पाठवायचं आणि ‘४०० पार’मध्ये मोदींसाठी एक आपला खासदार द्यायचा”, अशी शपथ घेण्यात आली.
महत्वाच्या बातम्या-
-ठरलं तर! पुण्यात मोहोळांसाठी घुमणार मोदींचा आवाज! “या” तारखेला होणार जंगी सभा
-‘ही निवडणूक गावकी-भावकीची नाही तर देशाचा पंतप्रधान ठरवण्याची’; आढळराव पाटलांचा कोल्हेंना खोचक टोला
-“नागरिकांना कायम उपलब्ध राहून काम करणार, हीच माझी गॅरंटी” – आढळराव पाटील
-इंटीमेट सीन्स करण्याआधी अभिनेत्री काय करतात? विद्या बालनने सांगितला तिचा अनुभव
-पाडाला पिकला आंबा!!! उन्हाळ्यात आंबा खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहिती आहेत का?