पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांची उमेदवारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी जाहीर करून अनेक दिवस उलटले आहेत. मात्र दुसरीकडे महायुतीतून नेमक्या कोणत्या पक्षाला ही जागा जाणार? उमेदवार कोण असणार? याबद्दलचा सस्पेन्स अद्याप कायम आहे. मात्र आता शिवसेनेमध्ये असणारे शिवाजीराव आढळराव पाटील हेच शिरूनमधून उमेदवार असतील, हे निश्चित झाल्याचं बोलले जात आहे. मात्र ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेकडून नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून लढणार आहेत. विशेष म्हणजे आढळराव पाटील यांच्या उमेदवारीला विरोध करणारे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या विरोधाची तलवार देखील म्यान झाली आहे.
शिरूर लोकसभेच्या उमेदवारीचा तिढा सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईमध्ये बैठक पार पडली. या बैठकीला मतदारसंघातील सर्व आमदार व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी देणं पक्षाच्या हिताचे असल्याची चर्चा झाली. आमदार मोहिते पाटील यांची वरिष्ठांनी समजूत काढल्यानंतर आपण मंत्री वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आढळराव पाटील यांचा प्रचार देखील करू, असं त्यांनी सांगितलं आहे.
“आज मुंबईमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघाची बैठक पार पडली, नेत्यांनी बैठकीमध्ये सर्वांचे मते जाणून घेतली. खरं म्हणजे हे वस्तुस्थिती आहे की, आढळराव पाटलांच्या उमेदवारीला माझा विरोध होता. तरीही नेत्यांचा आग्रह आहे की आपल्याला आढळराव पाटलांना उमेदवारी देणे फायद्याचे ठरणार आहे. शेवटी पक्षाचा फायदा एखाद्या गोष्टीने होणार असेल तर माझ्या भावना आणि मत मी बाजूला ठेवण्याचा विचार या निमित्ताने केला आहे. हे सर्व करताना कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यावं आणि ही सर्व प्रचाराची सूत्र वळसे पाटील यांच्याकडे द्यावीत, त्यांच्या नेतृत्वात मी काम करायला तयार असल्याची भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मांडली” असं मोहिते पाटील म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-निवडणुकीत ब्लॅक मनीचा वापर होऊ नये म्हणून इनकम टॅक्सकडून विशेष नियंत्रण कक्षाची स्थापना
-उमेदवारी डावलली अन् वरिष्ठांनी समजूत काढली, तरीही मुळीकांची नाराजी कायम; मतदारसंघातील बैठकीला दांडी
-“पुण्यातल्या भिंतीवरची ‘कमळ‘ पुसा, नाहीतर आयोगाला ‘हाताचा पंजा‘ भेट देऊ”
-“जेव्हा मी पुणे लोकसभेच्या रिंगणात उतरेल त्यावेळेस खऱ्या अर्थाने रंगत येईल”- वसंत मोरे
-लागा कामाला! आढळरावांना अजित पवारांची सूचना; शिरूरमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला?