Adah Sharma : दाक्षिणात्य सिनेमांमधून तसेच बस्तर आणि द केरला स्टोरी या सिनेमांमधून देशातील अनेक भागातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री अदा शर्मा सोशल मीडियावर अनेकदा आपल्या काही खास गोष्टींमध्ये नेहमी चर्चेत असते. अदा शर्मा ही उत्तम मराठी बोलायला शिकली आहे. तसेच मराठीसह संस्कृतमधील हिंदू धर्मातील अनेक मंत्र, श्लोक अदा शर्मा शिकली असून सोशल मीडियावर शेअर करत असते. त्यानंतर आता अदा शर्मा आणखी एका कारणामुळे चर्चेत आली आहे.
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे वांद्रे येथील घर अदा शर्माने विकत घेतले आहे. या घरात अदा शिफ्ट झाल्याची माहिती आता समोर आली आहे. याबाबत अदा शर्मा हीने प्रतिक्रिया दिली असून तिने म्हटलं की, मी फक्त ४ महिन्यांपूर्वीच सुशांतच्या घरात शिफ्ट झाले आहे आणि आता नवीन घरात पूर्णपणे सेटल देखील झाली आहे.
अदा शर्माने नुकतीच ‘बॉम्बे टाइम्स’शी यासंदर्भात संवाद साधला. अदा शर्मा ही सुशांत सिंह राजपूतचे घर विकत घेणार असल्याच्या चर्चा मागील अनेक दिवसांपासून होत्या. त्यातच अनेकजण तिला ‘हे घर विकत घेऊ नकोस’, असाही सल्ला देत होते. पण अदाने कोणाचाही सल्ला न ऐकता हे घर आता विकत घेतले आणि आता ती या घरात राहायला देखील गेली आहे.
“मी ४ महिन्यांपूर्वी फ्लॅटमध्ये शिफ्ट झाले. पण मी माझा चित्रपट ‘बस्तर’ आणि त्यानंतर ‘द केरळ स्टोरी’च्या ओटीटी रिलीजमध्ये व्यस्त होते. त्यानंतर मी मथुरेच्या हत्ती अभयारण्यात काही काळ घालवला. अलीकडे मला काही वेळ सुट्टी मिळाली आणि मी या घरात राहायला आलो. त्याचप्रमाणे मला या घरात अत्यंत सकारात्मक उर्जा मिळत आहे”, असे अदा शर्मा म्हणाली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-”त्या’ पराभवाची चीड माझ्या मनात निश्चितच, अजितदादांशी माझं बोलणं…’- संजोग वाघेरे
-संपूर्ण देशाचं लक्ष बारामती निकालाकडे; सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार बारामतीच्या खासदार?
-अरुण गवळीच्या सुटकेनंतर राजकीय पक्षांची साद; शिंदे-फडणवीस लागले तयारीला
-मोबाईल माणसाचं आयुष्य; याच मोबाईलचा आपल्या मेंदूवर कसा परिणाम होतोय?
-शिरुरचा खासदार कोण? आढळराव पाटील मागील पराभवाचा वचपा काढणार का?