पुणे : पुणे शहरामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. चारचाकी वाहनांना काळ्या काचा लावण्यास बंदी असताना देखील अनेक जण कारच्या काळ्या काचा बसवतात. अशातच आता पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या सुचनेवरुन वारजे वाहतूक विभागाने वाहतुकीचे नियम मोडल्या प्रकरणी एका माजी उपसरपंचाच्या काळ्या रंगाच्या फॉर्च्युनरवर कारवाई करत जप्त केली आहे.
माजी उपसरपंच अमोल कारले यांच्या (एमएच १२ व्हीएल २५४५) नंबरची काळ्या रंगाची एक फॉर्च्युनर मोटार फर्ग्युसन रस्त्यावर मंगळवारी संध्याकाळी उभी असल्याचे आढळून आले. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना पाठवलेल्या या व्हिडीओमध्ये काळ्या रंगाची ही गाडी असून त्याच्या सर्व काचादेखील पूर्णपणे काळ्या होत्या. या गाडीची मागच्या बाजूची नंबर प्लेटदेखील तुटलेली आढळून आली. त्यामुळे मागून गाडीची ओळख पटविणे अवघड होते. म्हणून फर्ग्युसन रस्त्यावर फिरणाऱ्या काळ्या काचा असलेली काळी गाडी फिरताना असतानाचा व्हिडीओ अमितेश कुमार यांना वीडियो पाठवला आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना व्हिडीओ पोहचल्यानंतर आयुक्तांनी गाडीच्या चौकशीचे आदेश दिले असता ही काळी गाडी माजी उपसरपंच अमोल कारले यांच्या नावावर असल्याचे समोर आले. त्यानंतर अमितेश कुमार यांच्या सूचनेवरुन कार गाडीला काळ्या काचा असल्याने जप्त करण्यात आली. या गाडीवर प्रिंटेड ग्लास (म्हणजे काळ्या काचा), तसेच महामार्गावर अधिक वेगाने गाडी चालवणे (ओव्हर स्पीड) असा विविध कलमानुसार वाहतूक भंग केल्याबद्दल सुमारे २३ हजाराचा दंड पण थकीत होता. याबाबत पोलीस आयुक्त कार्यालयाने तातडीने वारजे वाहतूक विभागाला तसा निरोप कळवला वारजे वाहतूक विभागांनी या ठिकाणी ही गाडी ताब्यात घेतली असून या गाडीवर सुमारे २३ हजारांचा दंड बुधवारी भरण्यात आला असल्याची महिती पोलिसांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-आधी डिलिव्हरी बॉय बनून केली रेकी अन् नंतर…; पुणे पोलिसांची २०२५ मधील सर्वात मोठी कारवाई
-ऐकावं ते नवलंच! भूक लागली म्हणून चोरट्यांनी बिर्याणी हॉटेल फोडलं, बिर्याणी तर नाहीच मिळाली पण…
-लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हफ्ता मिळाला पण…; भुजबळांच्या वक्तव्याचा योजनेवर परिणाम?
-‘महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचा सुपडा साप करणार’; शंकर जगताप यांचा विश्वास