पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर वाहतूक पोलिसांनी वाहतूक पोलिसांनी शहरात कडक कारवाई सुरु केली आहे. पुणे पोलिसांनी शहरात अचानक नाकाबंदी करुन वाहनचालकांची तपासणी करण्यास सुरवात केली आहे. शहरातील अनेक भागामध्ये ११७ मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई करुन खटले दाखल करण्यास सुरवात केली आहे.
कल्याणीनगर भागात वारंवार असे अपघाताची प्रकरणं समोर येत असतात. मात्र, वेदांत अग्रवाल अपघात प्रकरण हे चांगलेच चिघळले आहे. त्यामुळे पुणे वाहतूक पोलिसांनी या प्रकरणी कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणाला राजकीय वळणही लागले आहे. पुणे पोलिसांनी या पार्श्वभूमीवर कारवाईचा बडगा उगारुन शहरातील विविध भागात मद्यपी वाहनचालकांवर कारवाई केली आहे.
शहरातील मुंढवा, कोरेगाव पार्क, येरवडा, विमाननगरसह शहरातील अनेक भागात वाहतूक पोलिसांनी नाकाबंदी करून ११७ मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली आहे. मध्यरात्रीनंतर शहरात होणारे अपघात, तसेच मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी आता अचानक नाकाबंदी करण्यास देखील सुरुवात करण्यात आली आहे. वाहतूक पोलीस, तसेच स्थानिक पोलीस ठाण्यातील कर्मचार्यांनी शहरातील वेगवेगळ्या भागात नाकाबंदी केली आहे.
येरवडा आणि सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक कारवाया करण्यात आल्या आहेत. वाहतूकीच्या नियमांचे पालन न केल्याप्रकरणी पोलिसांनी २६२ वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली आहे. पोलिसांनी २ लाख ८४ हजार ५०० रुपये दंड वसूल केला आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढील काळात शहरात अचानक नाकाबंदी करून वाहनचालकांची तपासणी करण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Pune Hit & Run | पोर्शे अपघातानंतर व्हायरल रॅपर वेदांत अग्रवाल नाही, मग कोणी केला ‘तो’ रॅप?