पुणे : पिंपरी-चिंचवड महाापालिकेने शहरातील केलेल्या सर्वेक्षणातून तब्बल २४ अनधिकृत होर्डिंग्ज आढळून आले आहेत. यावरुन होर्डिंग धारक आणि जागामालकांवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. महापालिका प्रशासनाने होर्डिंगधारकांसोबत बैठक घेऊन अनधिकृत होर्डिंग काढून घेण्याची सूचना केली होती. त्यानंतर देखील अनेकांनी हे होर्डिंग काढले नाहीत. त्यामुळे महापालिकेने १५ ते २० मे २०२४ या कालावधीत अनधिकृत होर्डिंगचे सर्वेक्षण केले आहे.
महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणामध्ये २४ होर्डिंग अनधिकृत आढळून आले. त्यापैकी २० हटविण्यात आले आहेत. त्यामध्ये ९ होर्डिंग महापालिकेच्या वतीने पाडण्यात आले. तर, ११ अनधिकृत होर्डिंग स्वत: होर्डिंग धारकांच्या वतीने हटविण्यात आले आहेत. सर्वेक्षणामध्ये आढळून आलेल्या सर्व होर्डिंग धारकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सध्या राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या वादळी वाऱ्यामुळे अनेक भागात होर्डिंग कोसळून दुर्घटना झाल्या आहेत. काही ठिकाणी जिवीत हानी तर काही भागात लोक जखमी होऊन वित्त हानी झाल्याचे समोर आले आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे. अनधिकृत होर्डिंग पाडण्याची कारवाई सुरू आहे. महापालिकेच्या वतीने होर्डिंगधारकांसाठी स्थापत्यविषयक लेखापरीक्षणासाठी नवीन प्रणाली लागू करण्यात येणार आहे. होर्डिंगचे नियमित सर्वेक्षण आणि अनधिकृत होर्डिंगवरील कारवाई पुढेही सुरूच राहणार आहे. याबाबतच्या सूचना सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिल्याचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-चहाप्रेमींनो, जास्त वेळ उकळलेला चहा पिणं ठरु शकतं घातक; होऊ शकतात गंभीर परिणाम
-‘लोक तुम्हाला का नाकारतात? कारण, तुमचा…; पुणे अपघातावरुन मोहोळ-धंगेकरांच्यात तू-तू मै-मै!
-Pune Hit & Run: विशाल अग्रवालला बेल की जेल? वाचा कोर्टात आज नेमकं काय घडलं?
-Pune Hit And Run | वंदे मातरम संघटनेकडून विशाल अग्रवालच्या अंगावर शाईफेकचा प्रयत्न
-‘मध्यरात्री किती लोकांसाठी पोलीस स्टेशनला गेलात?’ अंबादास दानवेंचा सुनिल टिंगरे, अजितदादांना सवाल