पुणे : पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणात रोज नवी माहिती समोर येत असून अनेक धागेदोरे हाती लागत आहेत. मात्र आरोपी कोण? याचा शोध अद्यापही सुरुच आहे. या घटनेतील अल्पवयीन आरोपी हा मद्यधुंद अवस्थेत होता की नाही यासाठी त्याच्या रक्ताचे नमुने तापसण्यात आले मात्र ससून जिल्हा रुग्णालयामध्ये मुलाला वाचवण्यासाठी बड्या बिल्डर बापाने पैसे देऊन डॉक्टरांना रक्ताचे नमुने बदलण्यास सांगितले. तसेच रक्ताचा नमुना एक आणि रिपोर्ट दोन यामुळे संशयाची पाल चुकचुकली. या आरोपावरुन ससूनमधील २ डॉक्टरांना ताब्यात घेतले आहे. तसेच या प्रकणाच्या चौकशीसाठी एसआयटी समिती स्थापन करण्यात आली आहे.
या अपघात प्रकरणातील एसआयटी समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी ही डॉ. पल्लवी सापळे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. डॉ. सापळे यांच्यावर आधीच भ्रष्टाचाराचे ढीगभर आरोप आहेत. त्यामुळे एसआयटी समितीच्या निवडीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. नियुक्तीनंतर प्रथमच पल्लवी सापळेंसह समितीचे सदस्य ससून रुग्णालयात दाखल झाले. त्यावेळी त्यांनी अध्यक्ष निवडीबाबत आणि टीकांवर माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
डॉ. सापळे यांची नियुक्तीवर सध्या अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आणि विरोधकांकडूनही टीकेची झोड उठवली जात आहे याबाबत बोलताना पल्लवी सापळे म्हणाल्या, “माझी नियुक्ती शासनाने केली आहे. याचे उत्तर देण्याचे सक्षम अधिकारी शासन आहेत. मी नाही…”
“पुणे कल्याणीनगर अपघातप्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी मी आहे. या अपघाताचा घटनाक्रम आम्ही घेऊन त्याबद्दलचा अहवाल शासनाला कळवू. शासनाच्या चौकशीचे निकष ठरले आहेत त्याप्रमाणे चौकशी करणार आहे. त्या दिवशी घडलेल्या घटनेची चौकशी होणार आहे. त्याच्या संबंधी असणाऱ्या सर्वांची चौकशी होईल”, असे डॉ. सापळे म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘ससूनच्या गेल्या ५ वर्षांच्या कामाचं रेकॉर्ड काढा अन्…’; सुप्रिया सुळेंची सरकारकडे महत्वाची मागणी
-कल्याणीनगर अपघाताबाबत दादांनी पोलीस आयुक्तांना का फोन केला? अजित पवारांनी सांगितलं नेमकं कारण
-पुणे अपघात प्रकरणाला वेगळं वळण; ‘त्या’ आमदाराच्या फोननंतर आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलले?
-‘एक बोट दुसऱ्याकडे दाखवता तेव्हा ४ बोटं तुमच्याकडे वळतात’; शिंदे गटाचे धंगेकर, अंधारेंना खडेबोल