पुणे : पुण्यातील कल्याणीनगरमधील अपघातानंतर शहरात आणखी एक भीषण अपघात झाला आहे. पुणे-नाशिक महामर्गावर कळंब येथे कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे पुण्यातील खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याकडून हा अपघात झाला आहे. त्यामुळे आमदार पुतण्याने बेदरकारपणे गाडी चालवून दोघांना गाडीखाली चिरडल्याची माहिती समोर येत आहे.
ओम सुनिल भालेराव याचा जागीच मृत्यू झाला आहे. रविवारी मध्यरात्री पुणे-नाशिक महामार्गावर हा भीषण अपघात झाला आहे. अपघातानंतर स्थानिकांनी अपघाताची माहीती पोलिसांनी दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघातानंतर रात्री उशिरा पोलिसांनी दिलीप मोहिते पाटील यांचे पुतणे मयुर मोहिते पाटीलवर गुन्हा दाखल केला आहे. अपघातावेळी आरोपी मयुर मोहितेने मद्यप्राशन केले होते का? हे प्रकरण देखील पोर्शे अपघातासारखेच आहे का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. पोर्शे अपघात प्रकरणामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांचे नाव आले होते. त्यानंतर आता दिलीप मोहिते पाटलांच्या पुतण्याकडून हा अपघात झाला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यावर काय प्रतिक्रिया देणार? आणि या अपघात प्रकरणांचा आगामी विधानसभा निवडणुकींवर काय परिणाम होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-प्रदेशाध्यक्ष पुण्यात अन् काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी, अंतर्गत वाद चव्हाटयावर
-देशात पेपरफुटीविरोधी कायदा लागू; कारवाईची तरतूद काय असणार? वाचा सविस्तर…
-‘अजितदादांना एकटं पाडलं जातंय त्यांनी महायुती सोडावी अन्…’; राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचं वक्तव्य
-ससूनचे नवे अधिष्ठता डॉ. एकनाथ पवारांची डॉक्टरांना तंबी; म्हणाले, ‘रुग्णांना बाहेरुन…’