पुणे : पुणे शहरामधील गुन्हेगारीचे प्रमाण काही केल्या थांबताना दिसत नाही. रोज नवीन धक्कादायक घटना होत असतात. कल्याणीनगर कार अपघाताचा निकाल अद्याप लागला नाही, त्या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या तरुणांचे कुटुंब अद्यापही सावरलेलं नाही तोच पुण्यात आणखी एक धक्कादायक अपघात घडला आहे.
पुण्यात गस्त घालणाऱ्या दुचाकीला धडक देऊन चारचाकी चालक पसार झाला आहे. या घटनेत पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. समाधान कोळी असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. तर, पी. सी. शिंदे असे जखमी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पी. सी. शिंदे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना जुन्या पुणे- मुंबई महामार्गावरील हॅरीश पुलाजवळ घडली आहे.
अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. रविवारी मध्यरात्री समाधन कोळी आणि पी. सी. शिंदे हे बीट मार्शल म्हणून गस्त घालत होते. यावेळी त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली आहे. दरम्यान शहरामध्ये वाढत चाललेल्या गुन्हेगारीमध्ये सध्या पोलीस कर्मचारी देखील सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे. २ दिवसांपूर्वीच महिला पोलीस कर्मचाऱ्यावर ऑन ड्युटी पेट्रोल टाकून जिंवत जाळण्याचा प्रयत्न झाला. ही घटना ताजी असतानाचा आता या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना भरधाव कारने धडक दिली यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-अजित पवारांच्या आमदाराचं ठरलंय; ‘विधानसभेसाठी अनेकांकडून संपर्क, मी…’
-‘पुढची निवडणूक बारामतीतून लढणार’; महादेव जानकरांची मोठी घोषणा
-सुर्यकुमार यादवच्या ‘त्या’ कॅचवर अजित पवारांची मिश्किल प्रतिक्रिया; ‘त्याने तो कॅच नसता घेतला तर….’
-विधानसभेची तयारी! ठाकरे गटाकडून निवडणूक लढण्यास इच्छुक असणाऱ्यांनी घेतली शरद पवारांची भेट