पुणे : अभिनेते आणि बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. अभिजीत बिचुकले हे अभिनय क्षेत्रात काम करताना दिसतात. ते गायनही करताना आपण त्यांना पाहिलं आहे. त्याचबरोबर अभिजीत बिचुकले यांनी राजकीय क्षेत्रातही पाय ठेवला आहे. त्यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढली होती. त्यावेळी त्यांना पराभव पत्कारावा लागला होता. मात्र आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अभिजीत बिचुकले यांनी निवडणूक लढणार असल्याची माहिती दिली आहे.
खासदार म्हणून निवडून आल्यानंतर बिचुकले काय काय कामे करणार हे देखील सांगितले आहे. येत्या १९ एप्रिल रोजी अभिजीत बिचुकले सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक अर्ज भरणार असल्याचे अभिजीत बिचुकले यांनी सांगितले आहे.
‘२००४, २००९, २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत मला चांगला पाठिंबा दिला तसाच या निवडणुकीतही द्या. मी निवडणूक अर्ज दाखल केला असून मतदार राजा जागृत राहिला पाहिजे, असे अभिजीत बिचुकले म्हणाले आहेत.
“उदयन दादांची भाजपमधून निवडणूक लढवण्याची इच्छा पूर्ण झाली. मात्र भाजपने छत्रपतींना किती सन्मान दिला याबाबत उदयनराजे आणि लोकांनी पाहावं”, असंही अभिजीत बिचुकले म्हणाले आहेत.
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने संसद भवन उभारण्याची मागणी मी केली होती. समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक बांधण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. ५ वर्षांआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भूमिपूजन केलं, पण स्मारकाची एकही विट रचली गेली नाही,” असं म्हणत अभिजीत बिचुकलेंनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.
‘दोन रुपयाची दारू पाजून, मटण देऊन शक्ती प्रदर्शन केले जात नाही.’, असे म्हणत अभिजीत बिचुकले यांनी राजकारण्यांना टोला लगावला आहे. “शरद पवार आणि उदयनराजे यांचे हाडवैर आहे. वेळ आली की मी त्यांच्यावर बोलणार”, असल्याचं देखील अभिजीत बिचुकले म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-“४० वर्षानंतरही परकं मानलं जातं, तळपायाची आग मस्तकात जाणार नाही का?” अजित पवारांचा तिखट सवाल
-आता मनसेची ताकद मोहोळांच्या पाठीशी! मनसैनिक करणार पुण्यात प्रचार, ठाकरेंच्या भेटीत नेमकं काय ठरलं?
-‘त्यांना पंतप्रधान व्हायचंय, ते सोशल मीडियाच्या आहारी गेलेत’; अमित ठाकरेंचा वसंत मोरेंना टोमणा
-Shirur Lok Sabha | ‘हे तर दुसरे संजय राऊत’; आढळराव पाटलांचा अमोल कोल्हेंवर निशाणा