पर्वती : कल्पकतेच विद्यापीठ कुठ काढता आले तर ते काँग्रेस नेते आबा बागुल यांच्या मतदारसंघात काढावे लागेल, कारण त्यांनी आजवर अनेक वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प आपला भागात राबवल्या आहेत. मी आठ वेळा आमदार झालो मंत्री झालो पण केव्हा मतदार संघ काँग्रेसकडे नसल्याने आबा बागुल आमदार होऊ शकले नाही. काय करते कधीच महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री देखील झाले असते, अशी भावना काँग्रेसचे विधिमंडळ घटनेचे बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे. पुणे नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने थोरात यांना महर्षी पुरस्काराने गौरविण्यात आले यावेळी ते बोलत होते.
रोजी विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी आबा बागुल हे गेली अनेक वर्षांपासून प्रयत्नशील आहेत. परंतु हा मतदारसंघ आजवर राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहिल्याने त्यांना संधी मिळाली नाही. यंदा काही झालं तरी लढायचं हा नारा देत बागुल मैदानात उतरले आहेत. गेली अनेक वर्षांपासून नवरात्रीच्या निमित्ताने त्यांच्या माध्यमातून पुणे नवरात्र महोत्सव साजरा केला जातो. काल महर्षी पुरस्काराने बाळासाहेब थोरात यांना गौरवण्यात आले.
यावेळी बोलताना थोरात म्हणाले, “महर्षी पुरस्काराने मला गौरवण्याचं सांगण्यात आल्यानंतर मला सुखद धक्का बसला, आबा बागुल हे ६ वेळा नगरसेवक झाले, मात्र पर्वती मतदारसंघ काँग्रेसकडे नसल्याने त्यांना विधानसभा लढवता आली नाही. परंतु यंदा आम्ही सर्व बाजूने प्रयत्न करत आहोत. थोडा उशीर झालाय पण येत्या काळात नक्कीच तुमचं चांगलं होईल”
महत्वाच्या बातम्या-
-काकांचा-पुतण्याला धक्का; ‘हा’ माजी आमदार तुतारी फुंकण्याच्या तयारीत
-सुनील शेळके अजितदादांसमोर भर सभेत म्हणाले, ‘तुम्हाला दादागिरी आणि दहशत करायची असेल, तर…’
-युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; भाजयुमोच्या कार्यकर्त्यांकडून निदर्शने
-राहुल गांधींच्या अडचणी वाढणार? पुणे न्यायालयाने धाडले समन्स; नेमकं प्रकरण काय