पुणे : ऐन सणासुदीच्या काळात महागाईने उच्चांक गाठला आहे. वाढत्या महागाईच्या काळात, समाजातील गरीब, कष्टकरी वर्गातील पालकांना आपल्या पाल्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे. तसेच कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये, या उद्देशाने पर्वती मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार आबा बागुल यांनी मतदारसंघातील मुलांसाठी ई-लर्निंग स्कूल उभारणार असल्याचे आश्वासन दिले आहे. मतदारसंघातील उर्वरित ५ प्रभागात राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलच्या धर्तीवर ई-लर्निंग स्कूलची उभारणी येत्या ५ वर्षात केली जाईल’, असे आश्वासन अपक्ष उमेदवार आबा बागुल यांनी शुक्रवारी दिले आहे.
पुण्यासारखं महानगर एकीकडे ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट, विद्येचं माहेरघर अशी बिरुद मिरवत असतानासुद्धा, त्याच पुण्यात अजूनही समाजातील आर्थिक दुर्बल घटक हे दर्जेदार शिक्षणापासून वंचित आहेत. त्यामुळेच दूरदृष्टी, नाविन्याची कास आणि समाजातील प्रत्येक घटकाचा विचार यालाच प्राधान्य देऊन मी पुणे महानगरपालिकेतर्फे राजीव गांधी अकॅडमी ऑफ ई-लर्निंग २०११ मध्ये सुरु केली. आज गेल्या १३ वर्षांपासून गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे देशात एक रोल मॉडेल आणि देशातील पहिले ई लर्निंग स्कुल ठरले आहे आणि अल्पावधीत लोकप्रियही झाले आहे, असे आबा बागुल यांनी सांगितले.
आजमितीला स्कुलमधील माजी विद्यार्थी विविध क्षेत्रात उच्च पदांवर यशस्वी व्यावसायिक कारकीर्द करत आहेत. दहावी बारावी मध्ये टॉपर ठरलेले विद्यार्थी आयआयटी सारख्या सर्वोच संस्थांमध्ये प्रवेश मिळवून तेथील गुणवंत विद्यार्थ्यांच्या बरोबरीने टॉपर ठरत आहेत. काही विद्यार्थी आयपीएस अधिकारी तर काही अभियांत्रिकी क्षेत्रात नाव उज्ज्वल करत आहेत. गेले अनेक वर्षे सातत्याने दहावी -बारावी आणि अन्य परीक्षांच्या निकालांमध्ये शंभर टक्क्यांची परंपरा कायम राखणाऱ्या ई स्कुलमधील ५०० विद्यार्थ्यांनी आयआयटीमध्ये तर जेईईमध्ये १००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. इतकेच नव्हे तर राजेश अग्रवाल हा ई स्कुलचा माजी विद्यार्थी जेईई मेन्स परीक्षेत देशात प्रथम आला आहे. ‘नासा’ सारख्या अंतराळ संशोधन करणाऱ्या अमेरिकन संस्थेमध्ये दोन विद्यार्थीही पात्र ठरले. हे ई स्कुलसाठी, पुणेकरांची मान अधिक उंच करणारी बाब आहे.
महापालिकेच्या शाळेत १ हजार ५०० पेक्षा जास्त प्रतीक्षा यादी असणारे हे पुण्यातील नव्हे, तर राज्यातील एकमेव स्कुल आणि हीच येथील दर्जेदार शिक्षणाची ग्वाही आहे. हीच ज्ञानगंगा संपूर्ण भारतात पोहोचावी यासाठी मी तत्कालीन पंतप्रधान आणि ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग याची भेट घेऊन ही कल्पना त्यांना दिली व असा शैक्षणिक प्रकल्प देशभर राबवू असेही म्हंटले होते, असे आबा बागुल यांनी सांगितले. त्यामुळेच निवडून आल्यावर पर्वती मतदार संघात ५ प्रभागांमध्ये ५ ई लर्निंग स्कूल उभारणारच, असे म्हणतच उपस्थित शेकडो नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाटात प्रतिसाद दिला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-सुरक्षित पुण्यासाठी महायुतीचं मोठं पाऊल; नव्या पोलीस ठाण्यांच्या निर्मितीसाठी ६० कोटींचा निधी
-Assembly Election: पुण्यात पंतप्रधान मोदींची सभा; ड्रोन, पॅराग्लायडर उडवण्यास बंदी
-मविआचे उमेदवार अजित गव्हाणेंच्या वक्तव्याने नवा वाद; संतपीठावरील संचालकांचे ‘कॅलिबर’ काय?
-सुनील तटकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन सुळेंचं ओपन चॅलेंज, म्हणाल्या, ‘त्याच्या दोन्ही बाजू फक्त…’
-कसब्यात महायुती एकवटली; जनतेच्या आशीर्वादाने रासनेंचा विजय निश्चित – मानकर