पुणे : पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षांची संख्या आणि टेकड्या यांची महत्वाची भूमिका बजावत असतात. त्यामुळे ही बाब समोर ठेवून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपला यंदा १० जून रोजीचा वाढदिवस वृक्ष संवर्धनासाठी समर्पित केला असून, आपल्या ६५ व्या वाढदिवशी पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अमरावती आदी जिल्ह्यांसह राज्याच्या विविध भागात ६५ हजार वृक्षारोपणाचा संकल्प केला आहे. या संकल्पात सर्वांनी हातभार लावावा, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील हे आपला वाढदिवस नेहमीच सामाजिक कार्यासाठी समर्पित करत असतात. गेल्या वर्षी त्यांनी आपला वाढदिवस आरोग्य सेवेसाठी समर्पित केला होता. याअंतर्गत कार्यकर्त्यांना आवाहन केले होते की, पुष्पगुच्छ, हार-तुरे नकोत, तर आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील रुग्णांवर उपचारासाठी आणि मुलींना शिक्षणासाठी निधी संकलनात योगदान देण्याचे आवाहन केले होते.
चंद्रकांत पाटील यांच्या आवाहनाला कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत, भरीव निधी संकलन झाले होते. या संकलित निधीतून कोथरुडमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील १०९७ रुग्णांवर वैद्यकीय उपचार करण्यात आले होते. तसेच, ३०० मुलींना शिक्षणासाठी मदत करण्यात आली.
यंदा चंद्रकांत पाटील यांनी आपला वाढदिवस वृक्ष संवर्धनासाठी समर्पित केला आहे. पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अमरावती आदी जिल्ह्यांसह राज्याच्या विविध भागात एकूण ६५ हजार वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. यातील पहिल्या टप्प्यात कोथरुड मधील महात्मा, म्हातोबा, पाषाण आदी भागातील टेकड्यांवर औषधी वनस्पतींसह पर्यावरण संवर्धनात अतिशय महत्वाचे ठरणारे वृक्ष लावण्यात येणार आहेत. तसेच, याचे जतन करुन, त्याच्या वाढीसाठी सर्वप्रकारचे नियोजन केले आहे. यासाठी वन विभागाचेही सहकार्य घेण्यात येणार आहे.
त्यामुळे पुणेकरांचे उद्याचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी वृक्ष संवर्धनाच्या कार्यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे. दिनांक ९ जून रोजी सकाळी ७ वाजता हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-प्रांताधिकार्याचे आरोप, जिल्हाधिकारी दिवसेंनी सांगितलं सत्य; नेमकं प्रकरण काय?
-“‘हे’ उद्धव ठाकरेंनी दोन्ही मुलांच्या डोक्यावर हात ठेवून सांगावे”- नितेश राणे
-जिल्हाधिकारी दिवसेंविरोधात थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार; प्रांताधिकाऱ्यांनी केली बदलीची मागणी
-रवींद्र धंगेकरांनी पुण्याला दिली उडता पंजाबची उपमा; म्हणाले, “उमलती फुले कोमजण्याचे काम…”
-पुण्यात धक्कादायक प्रकार; जमिनीच्या वादातून २२ वर्षीय तरुणीला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न