पुणे : पुणे शहरात २ दिवसापूर्वी तुफान पावसाने हजेरी लावली होती. या पावसाने शहरातील अनेक भागात पाणी साठले होते. काही भागातील घरांमध्ये गुडघ्याएवढे पाणी साचले होते. या पार्श्वभूमीवर कोथरुड मतदारसंघातील औंध, बाणेर, बावधन भागातील पावसाळापूर्व कामांचा आढावा चंद्रकांत पाटील यांनी आज (८ जून) घेतला. पावसाळा पूर्व कामांतील नालेसफाईची आणि रस्ते दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना चंद्रकांत पाटील यांनी या बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
महापालिकेच्या वतीने अनेक भागात पिण्याच्या पाण्याच्या आणि ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे ठिकठिकाणी रस्ते खोदाई करण्यात आली आहे. मात्र त्याची योग्य पद्धतीने दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे तयार झालेल्या खड्ड्यांमुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता लक्षात घेता, पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याच्याही आदी सूचना दिल्या आहेत.
पथ दिव्यांची देखभाल दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावीत. याशिवाय धोकादायक झाडांच्या फांद्यांची वेळीच छाटणी करुन, कचरा उचलण्यात यावा. तसेच, पदपथ तथा मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणांवर कारवाई करुन, अतिक्रमणमुक्त पदपथ करावेत, आदी सूचना देखील या बैठकीत दिल्या आहेत.
चंद्रकांत पाटील यांनी घेतलेल्या आढावा बैठकीला पुणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम, पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, मलनिःसारण विभागाचे अधिक्षक अभियंता दिनकर गोजरे, पाणीपुरवठा विभागाचे नंदकिशोर जगताप, उपायुक्त परिमंडळ क्रमांक.२ चे उपायुक्त गणेश सोनूने, बाणेर-औंध क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर, कोथरूड-बावधनचे सहाय्यक आयुक्त केदार वझे, भाजपा शहर सरचिटणीस पुनीत जोशी, कोथरूड मंडल दक्षिणचे अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, उत्तरचे अध्यक्ष सचिन पाषाणकर यांच्या सह महापालिकेच्या विविध खात्याचे अधिकारी तसेच माजी नगरसेवक अमोल बालवडकर, दिलीप वेडे-पाटील, किरण दगडे पाटील, नगरसेविका स्वप्नाली सायकर, ज्योती कळमकर, अल्पना वर्पे, छाया मारणे, डॉ. श्रद्धा प्रभूणे-पाठक, भाजपा नेते दिनेश माथवड, राहुल कोकाटे उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या-
-अजित पवारांना मोठा धक्का; ‘या’ बड्या मंत्र्याचे शरद पवार गटात होणार कम बॅक?
-पालिका आयुक्त अॅक्शन मोडमध्ये; या कर्मचाऱ्यांना दिला सज्जड दम, वाचा काय नेमकं प्रकरण
-विशाल अग्रवालच्या अडचणी वाढल्या; महाबळेश्वरमधील ‘त्या’ पंचतारांकित हॉटेलवर चालवला जेसीबी
-अजित पवार गटाचे आमदार मनोज जरांगेंच्या भेटीला; म्हणाले, ‘आम्ही तुमच्यासोबत’