पुणे : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पुर्ण झाली. पुणे जिल्ह्यातील मावळ, पुणे आणि शिरुर मतदारसंघातील मतदान सोमवारी १३ मे रोजी झाले. पुणे लोकसभेमध्ये महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे यांच्यात लढत झाली. या निवडणुकीमध्ये महायुतीने जोरदार प्रचार केला होता. इतर उमेदवारांच्या तुलनेत मुरलीधर मोहोळ यांचा प्रचार सर्वाधिक प्रभावी झाला.
पुणे जिल्ह्यातील पुणे मतदारसंघातील मतदान पूर्ण होण्याआधीच पुणे शहरात मुरलीधर मोहोळ यांचे ‘खासदार मुरलीधर मोहोळ’ असे पोस्टर झळकत आहेत. मोहोळ यांच्या विजयाचा भाजप तसेच महायुतीला दांडगा विश्वास आहे. त्यामुळे शरहात ठिकठिकाणी मोहोळांचा खासदार असा उल्लेख करत पोस्टर लावण्यात आले आहेत. ोशहरातील हे पोस्टर पाहून सर्वजण आश्चर्य व्यक्त करत आहेत.
पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये सोमवारी सकाळी ७ वा. पासून ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत एकूण ५१.५६ टक्के मतदान पार पडले आहे. सर्वात जास्त मतदान हे कसबा पेठमधून झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
कसबा पेठ – ५७.०९%
कोथरूड – ४९.०१%
पर्वती – ५२.४३%
पुणे कॅन्टोन्मेंट – ५०.५२%
शिवाजीनगर – ४९.७२%
वडगाव शेरी – ४९.७१%
महत्वाच्या बातम्या-
-‘माझ्या शिकल्या सवरलेल्या भावासाठी मी शूटिंग बंद करून मैदानात उतरलेय’- प्रवीण तरडे
-मावळात ठाकरेंच्या शहरप्रमुखाला अटक; मतदान केंद्रावर झाली झटापट
-पुण्यात 8 तासात तब्बल 34.07 टक्के मतदान; पुणेकरांची मतदान करण्यासाठी लगबग
-पिंपरी-चिंचवडमध्ये कमी मतदान; मावळ मतदारसंघात आतापर्यंत किती टक्के मतदान झाले?
-निवडणूक प्रशानसनाच्या कारभारावर मुरलीधर मोहोळ संतापले; म्हणाले, ‘एवढ्या उन्हात थांबवलं तर..’