पुणे : पुणे शहरामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढताना दिसत आहे. कोयता गँग, दहशवादी टोळ्या दहशत माजवताना दिसतात. दिवसाढवळ्या खून, बलात्कारासारख्या घडत असतानाच बीड जिल्ह्यातील एका गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी देखील पुण्यातच सापडले. अशातच आता शहरातील एरंडवणे भागातील डीपी रोडवरील कौंटुंबिक वादातून बदला घेण्यासाठी पिस्तुल बाळगणाऱ्या तरुणाला गुन्हे शाखेने अटक केली आहे.
आकाश बळीराम (वय २४, रा. सिंहगड रस्ता) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. आरोपी आकाशला जमिनीच्या वादातून त्याच्या चुलत मामाने धमकी दिल्याचा राग डोक्यात ठेवून बदला घेण्यासाठी पिस्तूल घेऊन फिरत होता. या तरुणाला गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. तसेच आकाशला पिस्तूल देणाऱ्या सुभाष बाळू मरगळे (वय २४, रा. वडगाव बुद्रुक) यालाही अटक करण्यात आली आहे.
आरोपी आकाशचा चुलत मामाशी जमिनीच्या मालकीवरुन वाद झाला होता. मामाने आकाशला जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे त्याने मामाचा बदला घेण्यासाठी सुभाष मरगळे याच्या मध्यस्थीने हडपसरमधील एकाकडून पिस्तूल विकत घेतल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. आरोपी आकाश एरंडवणे भागातील डीपी रस्त्यावर थांबला होता. त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर चित्ते यांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा लावून आकाशला ताब्यात घेतले आहे. त्यानंतर त्याची झडती घेतली त्यावेळी त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्याच्या एफसी रोडवरही वाल्मिक कराडचं घबाड; एकाच इमारतीत कोट्यावधींची संपत्ती
-पुणे तिथे काय उणे! पुणेकर वाहतूक कोंडीतही ठरले अव्वल
-पुण्यात लक्ष्मण हाकेंची पत्रकार परिषद; अन् ५ मिनटापूर्वीच आला ‘तो’ फोन
-धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर प्रश्न विचारताच अजितदादा भडकले, म्हणाले,…