पुणे : ‘लिव्हिंग इट लार्ज’ची भावना साजरी करत सीग्राम्स रॉयल स्टॅगतर्फे पुण्यात द मिल्स येथे रॉयल स्टॅग बूमबॉक्स ह्या सांगीतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते . ह्या सोहळ्यात बॉलीवूडची लोकप्रिय गाणी आणि हिप-हॉपचा धुंद करणारा ठेका यांचा मिलाप होतो. उपस्थितांनी एकाच छताखाली संस्कृती, विविध खाद्य पदार्थ आणि परस्पर संवादाचा आस्वाद घेतला. या प्रसंगाचे वातावरण तरुणाईने सळसळणारे होते, जे शहराच्या चैतन्यमय वृत्तीला साजेसे होते. मुख्य अॅक्ट्स व्यतिरिक्त स्थानिक बॅन्ड, डान्सर्स, रॅपर्स, बीटबॉक्सर्स यांच्या नानाविध परफॉर्मन्सेसने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.
या संगीत जलशाची सुरुवात अली मर्चंटने मॅशअप्स सादर करून केली. त्यानंतर हिप-हॉप कलाकार डी एमसीने आपल्या हिप-हॉपच्या लयकारीने प्रेक्षकांवर गारुड केले. त्यानंतर पुढे या जलशात निकिता गांधीने आपल्या सुंदर गायनाने रंग भरले. या फेस्टिव्हलची सांगता अरमान मलिकच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या परफॉर्मन्सने झाली.
गायक आणि गीतकार अरमान मलिक म्हणाला, “संगीत सर्व सीमारेषा ओलांडून लोकांना जवळ आणते. सलग दुसऱ्या वर्षी रॉयल स्टॅग बूमबॉक्सचा एक भाग असल्याचा मला खूप आनंद आहे. आधी इंदूरमध्ये आणि आता पुण्यात परफॉर्म करण्याचा अनुभव खूप सुंदर होता.”
परनॉड रिकार्ड इंडियाचे सीएमओ कार्तिक मोहिन्द्रा म्हणाले, “संगीत आणि लाईव्ह परफॉर्मन्स लोकांना एकत्र आणतात आणि उत्सवप्रिय लोकांसाठी ती एक पर्वणी असते. रॉयल स्टॅगने तरुणांच्या पॅशनचा मुख्य स्तंभ म्हणून संगीत साजरे करण्याची परंपरा चालू ठेवली आहे. या ब्रॅंडची ‘लिव्ह इट लार्ज’ भावना आणि तरूणांशी जोडण्याची वृत्ती जोपासत, रॉयल स्टॅग बूमबॉक्सची दुसरी आवृत्ती लॉन्च करताना आम्हाला आनंद होत आहे. या वर्षी या मंचाने बॉलीवूड संगीत आणि हिप-हॉपची लयबद्धता यांची सांगड घालून आणि त्याला कला आणि संस्कृतीची जोड देऊन हा अनुभव आणखी सुंदर केला आहे आणि ‘लिव्हिंग इट लार्ज’ ची भावना सार्थक केली आहे.”
रॉयल स्टॅग बूमबॉक्सच्या दुसऱ्या आवृत्तीविषयी बोलताना साऊथ एशिया, वेव्हमेकरचे सीईओ अजय गुप्ते म्हणाले, “रॉयल स्टॅग बूमबॉक्सच्या प्रवासातील सहभाग चालू ठेवताना वेव्हमेकर रोमांचित आहे. हा केवळ संगीत महोत्सव नाही, तर या ब्रॅंडच्या ‘लिव्हिंग इट लार्ज’ भावनेला सामावून होणाऱ्या सांस्कृतिक चळवळीचे ते प्रातिनिधिक स्वरूप आहे. रॉयल स्टॅग बूमबॉक्समध्ये स्वॅग, भावना आणि बॉलीवूड व हिप-हॉप मधल्या सळसळत्या मिलाफाचे अविस्मरणीय मिश्रण आहे. या पिढीमध्ये असलेली लय या उत्सवात दुमदुमताना दिसली.”
महत्वाच्या बातम्या-
-Pune | पुणेकरांना कडाक्याच्या उन्हापासून मिळणार दिलासा; ‘या’ दिवशी पावसाचे संकेत
-‘विकासकामे करणे म्हणजे एक्टिंग करण्यासारखं नाही’; आढळराव पाटलांचा कोल्हेंवर निशाणा