पुणे : पुणे विद्येचे माहेरघर म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. विविध राज्य, शहरातून विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. मात्र शिक्षण सोडून काही अवैध कामेही विद्यार्थी करताना दिसत आहेत. असेच एक प्रकरण पुण्यातील कात्रज परिसरातून समोर आले आहे. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने कात्रज परिसरात कारवाई करीत गांजाची तस्करी उघडकीस आणली.
या प्रकरणी पोलिसांनी सिव्हिल इंजिनिअर तरूणासह त्याच्या दोन साथीदारांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून २७ किलो ३२५ ग्राम गांजा जप्त करण्यात आला आहे. हरीओम संजय सिंग (वय २१, मोहाडी), करण युवराज बागुल (वय २३, पद्मावती कॉलनी, शिरपूर), वसंत सुभाष क्षिरसागर (आंबेगाव बुद्रुक) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरीओम सिंग हा इलेक्ट्रीकची कामे करतो. त्याच्यावर शिरपुर पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट ३ (२५) असा गुन्हा दाखल आहे. तर, करण बागुल हा सिव्हिल इंजिनिअर असून त्याच्यावर शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी गस्तीवर असताना आरोपींबाबत पोलिसांना माहिती मिळाली होती.
त्यानुसार कात्रज येथे सापळा लावून दोघांना ताब्यात घेण्यात आले होते. आरोपींनी हा गांजा आंबेगाव बुद्रुक येथे राहणारा वसंत क्षिरसागर याला देण्यासाठी आणल्याचे समोर आले आहे. क्षीरसागर याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्यात आले. तो बीबीएचे शिक्षण घेत असून त्याच्याजवळ देखील ८४ हजार ७०० रुपयांचा ४ किलो २३५ ग्रॅम गांजा सापडला असून पोलिसांनी गांजा जप्त केला आहे. त्याला देखील पोलिसांनी अटक करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे पोलीस दलात बेशिस्तपणा; पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा मोठा निर्णय
-महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची जगदीश मुळीकांनी घेतली भेट; शहरातील प्रश्नांसंदर्भात चर्चा
-नेता ते अभिनेता! अभिजीत बिचुकले लवकरच झळकणार चित्रपटात
-राग गेला, रुसवा हटला! राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मेधा कुलकर्णी काय म्हणाल्या?
-रोहित रावसाहेब नरसिंगे दिग्दर्शित ‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित