पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाकडून आपल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आले आहे तर अपेक्षेप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडून सुनिता पवार यांच्या नावाची अधिकृत घोषणा आज करण्यात आली. यामुळे आता बारामती लोकसभेत ननंद विरुद्ध भावजयचा सामना होणार हे निश्चित झालं आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघ यंदापासून पूर्ण महाराष्ट्र सह देशभरात चर्चेला आलेला आहे. इतिहासात पहिल्यांदाच तिथे शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी लढाई पाहायला मिळतेय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर दोन्ही पवारांकडून लोकसभेसाठी आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे.
सुप्रिया सुळे व्हिडिओ यांच्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा यांना उमेदवारी देत ही लढाई आरपारची होणार असल्याचे संकेत दिले आहेत. बारामतीमध्ये सध्या एका बाजूला अजित पवार तर त्यांच्या विरोधात संपूर्ण पवार कुटुंबीय सहभागी झाल्याचं दिसत आहे. आज दोन्ही गटाकडून अधिकृतपणे उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने आता खऱ्या अर्थाने लोकसभेच्या लढाईला रंग येणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीचे शिलेदार केले जाहीर; पहा कोणाला कुठून मिळाली उमेदवारी
-राष्ट्रवादीच्या गोट्यातून रासपला परभणीची जागा; महादेव जानकरांची उमेदवारी जाहीर
-…म्हणून विजय शिवतारे यांनी बारामतीच्या निवडणुकीतून माघार घेतली; स्पष्टच सांगितलं काय घडलं