पुणे : राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं, मंत्रिमंडळ विस्तारही झाला. यानंतर राज्यातील महिलांसाठी राज्य सरकारने राबलेली महत्वाची मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा पुढील हफ्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात कधी जमा होणार? प्रतिमहिना १५०० की २१०० रुपये जमा होणार? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र नुकत्याच झालेल्या नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनानंतर महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याचं सांगितलं.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेल्या दिलेल्या शब्दानंतर आता सरकारकडून हा हफ्ता महिलांच्या खात्यात जमा करण्याबाबतच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता महिलांना राज्य सरकारकडून नववर्ष सुरु होण्याआधीच खुशखबर मिळणार आहे. डिसेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे.
लाडक्या बहिणींना राज्य सरकारकडून मिळणार हे गिफ्ट आजपासूनच देण्यास सुरु केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यभरातील पात्र महिलांच्या खात्यात १५०० रुपये प्रतिमहिना प्रमाणे सहावा हप्ता लवकरच जमा होणार असून डिसेंबरच्या या हप्त्यासाठी सरकारकडून ३ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-शिवाजीनगर बस स्टॅन्डचा होणार कायापालट; अजित पवारांनी अधिकाऱ्यांना दिल्या सूचना
-पुण्याच्या विकासात भर; अजित पवारांची अधिकाऱ्यांसोबत महत्वाची बैठक
-वाघोलीत भरधाव डंपरने घेतला तिघांचा बळी; मद्यधुंद चालकाने फूटपाथवर झोपलेल्या ९ जणांना चिरडलं
-पुण्याच्या पालकमंत्रिपदाबाबत मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘यॉर्कर टाका, गुगली टाका, मी पण बॅट्समन’
-Pune: अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या आयोजकांना नाव बदलासाठी धमकीचे फोन