पुणे : विद्येचं माहेरघर आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुणे शहरामध्ये भरदिवसा हत्या, गोळीबार, दहशत, लूटमार, बलात्कार, गाड्यांची तोडफोड अशा घटनांची मालिका सुरुच आहे. यामुळे शहराची प्रतिमा मलिन होत आहे. काही दिवसांपासून कोयता गँगच्या दहशतीने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. आता शहरात आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. गे व्यक्तींना डी.एस.के. रोड ते रायकर मळा या परिसरात अज्ञात स्थळी बोलावून लुटमार आणि मारहाण करण्याची घटना घडल्याचे प्रकार आता समोर आले आहेत. या प्रकरणी नांदेड सिटी पोलिसांनी कारवाई केली असून या गँगमधील तिघांना अटक करण्यात आली आहे.
‘गे डेटिंग अॅप’चा गैरवापर करून ही गँग लोकांना फसवत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. डी.एस.के. रोड ते रायकर मळा परिसरातील अज्ञात स्थळी ते गे व्यक्तीला भेटायला बोलावतात. त्यांनतर त्यांना मारहाण करुन त्यांच्याजवळील ऐवज पैसे, मोबाईल आणि इतर मौल्यवान वस्तू लुटतात. या गँगने ‘गे’ लोकांमध्ये दहशत निर्माण केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
गे लोकांना लुटणाऱ्या या गँगमधील तिघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांची चौकशी सुरु आहे. या चौकशीमध्ये आरोपींनी एका अॅपचा वापर करून गे व्यक्तींशी ओळख केल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी या व्यक्तींना अज्ञात स्थळी भेटण्यासाठी बोलावलं. गे व्यक्ती भेटायला आल्यानंतर त्यांच्यावर हल्ला करून त्यांच्याकडे असणाऱ्या मौल्यवान वस्तू तसेच पैसे जबरदस्तीने हिसकावले. बदनामीच्या भीतीने बळी पडलेले गे तक्रार करत नव्हते. याचा आरोपी गैरफायदा घेत होते.
महत्वाच्या बातम्या-
-अजितदादांच्या विश्वासू नेत्याची मुजोरी; अद्याप अटक नाही, अजित पवार म्हणाले…
-पुण्यात १ रुपयात ड्रेसची ऑफर महागात; महिलांनी लावली रांगच राग, दुकानदार गायब
-‘गुइलेन बॅरी सिंड्रोम’ आजाराचा खर्च परवडेना! राज्य सरकार आणि महापालिका मदत करणार