पुणे : लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभांमधून प्रत्येक उमेदवारांमध्ये तुफान कलगितुरा रंगला आहे. प्रत्येक उमेदवार मतासाठी मतदारांना आश्वासनं देत आहेत. ‘आपल्या उमेदवाराला मतदान केले तरच निधी देऊ’, अशी काही वक्तव्यं देखील अनेक नेत्यांकडून केली जात आहेत. असंच वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीतील एका प्रचार सभेत केले होते. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने त्यांची तक्रार निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली होती. या तक्रारीवर अधिकाऱ्यांनी अजित पवारांना क्लीन चिट दिली आहे.
अजित पवारांनी बारामतीतील प्रचार सभेत म्हटले होते की, ‘तुम्हाला हव्या असलेल्या निधीसाठी आम्ही मदत करू. पण आम्ही तर निधी देणार असू, तर तुम्हीही आमच्या उमेदवारासमोरील बटन दाबावे, अशी आमची अपेक्षा आहे. त्यामुळे निधी देताना आम्हालाही बरं वाटेल.’ यावरून निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती.
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी गुरुवारी महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांबाबतचा अहवाल सादर केला आहे. अजित पवारांनी आचारसंहितेचा भंग केला नसल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मुरलीधर मोहोळांकडे आहे २४ कोटींचा मालमत्ता अन् एवढ्या कोटींचं कर्ज
-‘अजितदादा म्हणजे विकास कामे करणारे नेते‘; सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी आठवलेंचा झंझावाती दौरा
-‘त्यांना कदाचित बहिणीचं प्रेम कमी पडलं असेल’; सुप्रिया सुळेंची अजितदादांवर टीका
-पुणे मेट्रो धावतेय सुसाट! प्रवासी, उत्पन्न वाढले, पण प्रवाशांनी केली ‘ही’ मोठी तक्रार