पुणे : भारतरत्न पुरस्कार, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे ज्येष्ठ नेते, देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह आणि अपमानास्पद वक्तव्य केल्या प्रकरणी पत्रकार निखिल वागळे यांच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखिल वागळे यांच्यावर १५३ (अ), ५०० व ५०५ या कलामांतर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सोशल मिडिया एक्सवरून (ट्विटर) आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याबद्दल पत्रकार निखिल वागळे यांच्या विरोधात भाजपचे राष्ट्रीय नेते सुनील देवधर यांनी विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी तक्रार दाखल केली होती. पुण्यात आज निखिल वागळे यांची ‘निर्भय बनो सभा’ असल्याच्या पार्श्वभूमीवर हा गुन्हा दाखल झाल्याने सामाजिक कार्यकर्ते संताप व्यक्त करत आहेत.
‘ऐन लोकसभा निवडणुकीच्या आधी मोदींची प्रतिमा मलीन करण्याच्या तसेच देशात धार्मिक व जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने वागळे यांनी हे ट्वीट केले आहे. यामुळे सामाजिक सलोखा व कायदा सुव्यवस्थेला धक्का लावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तसेच देशाचे राष्ट्रपती हे जनजातीय समाजातून असून वागळे त्यांनी जाणीवपूर्वक राष्ट्रपती व भारतरत्न पुरस्काराचा अपमान केला आहे. जातीयवादी मानसिकतेला पोषक खतपाणी घालून देशभरातील अनुसूचित जाती-जमातींची अवहेलना करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, त्यामुळे त्यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करा’, अशी मागणी सुनील देवधर यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-शिक्षण संस्थांमध्ये अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार; संभाजी ब्रिगेडची चौकशीची मागणी
-“परेड काढूनही मस्ती असेल तर…”; अजित पवारांचा गुंडांना इशारा
-“पक्ष, चिन्ह, झेंडा आमच्याकडेच आता नेत्यांनी ठरवावं…”; अजितदादांचं इतर नेत्यांना आवतान
-“भुजबळांच्या पेकाटात लाथा घालू म्हणणाऱ्यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री का काहीच बोलत नाहीत?”
-..अन् शिक्षण मंत्री बनले शिक्षक! चंद्रकांतदादांनी घेतली विद्यार्थ्यांची शाळा