पुणे : पुणे शहर हे विद्येचे माहेरघर हे फक्त आता म्हणण्यापुरतेच राहिले की काय असा सवाल उपस्थित होत आहे. कारण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी एका विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. याप्रकरणी संबधीत पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काँग्रेसची विद्यार्थी संघटना म्हणजेच नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया संघटनेचा अध्यक्ष अक्षय कांबळे याच्याविरोधात चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेसची विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष अक्षय कांबळे याने अनेक विद्यार्थिनींना संदेश पाठवून त्रास दिला असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, अक्षय कांबळे याने नुकतेच एका विद्यार्थिनीला केलेल्या मेसेजमुळे तिला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला आहे. त्यामुळे पीडित विद्यार्थिनीने थेट पोलीस ठाणे गाठले. अक्षय कांबळे यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. चतुश्रृंगी पोलिसांनी अक्षय कांबळे यांच्यावर विनयभंग आणि विद्यार्थिनीचा छळ केल्याचे गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणात आता अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेने देखील उडी घेतली आहे. संबंधित विद्यार्थ्यांवर पुणे विद्यापीठ प्रशासनाने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली आहे. या प्रकरणात पुणे विद्यापीठ काय कारवाई करणार, हे पाहणं महत्वाचं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Pune Hit & Run | पोर्शे अपघातानंतर व्हायरल रॅपर वेदांत अग्रवाल नाही, मग कोणी केला ‘तो’ रॅप?
-पुणे अपघात प्रकरणी संजय शिरसाटांनी धंगेकरांना फटकारलं, म्हणाले, ‘राजकीय स्टंटबाजी थांबवा अन्…’
-कंगना रणौतचा खळबळजनक दावा; म्हणाली, ‘प्रत्येक नवीन अभिनेत्रीला दाऊदसमोर….’