पुणे : पुणे महापालिकेच्या एका अभियंत्याच्या टेबलाखाली नोटांचा बंडल सापडला आहे. या प्रकाराचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. पुणे महापालिकेच्या पथ विभागातील एका उपअभियंत्याच्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये ५०० रुपयांच्या बंडलची मोठी रक्कम सापडली आहे.
रंगेहात पकडलेल्या उपअभियंत्याने ही रक्कम माझी नाही, असे सांगून वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असल्याने त्या उपअभियंत्याची चांगलीच धांदल उडाली आहे. पुणे महापालिकेच्या पथविभागात मंगळवारी दुपारी हा प्रकार घडला. हा संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड करण्यात आलेला आहे. आम आदमी पक्षाचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष रविकांत काळे यांनी तो उघडकीस आणला आहे.
रविकांत काळे हे एका कामासाठी महापालिकेत गेले होते. त्यावेळी एक व्यक्ती उपअभियंत्याच्या ड्रॉवरमध्ये संशयास्पद काहीतरी ठेवलं आणि तो निघून गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यावरुन काळे यांनी संबंधित उपअभियंत्याला ड्रॉवर उघडण्यास सांगितला. मात्र, संशयास्पद असे काही नसल्याचं त्याने सांगितलं. त्यावर काळे यांनीच ड्रावर उघडला आणि त्यांना एका बॉक्समध्ये पाचशेच्या नोटांचा गठ्ठा आढळून आला. याबाबत विचारणा केली असता एक ठेकेदार ही रक्कम ठेवून गेला असून ते पैसे माझे नसल्याचं उपअभियंत्याने सांगितलं.
‘तुम्ही हे पैसे का ठेवून घेतले?’ याचं समाधानकारक उत्तर त्याला देता आलं नाही. त्यामुळे रविकांत काळे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला फोन करून याबाबतची माहिती दिली. आणि रितसर तक्रार केली आहे. काळे यांनी या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली मात्र अधिकारी वेळेवर पोहचले नाहीत आणि या महाशयाने रोख रकमेसह तिथून पळून गेला. त्यामुळे आम आदमीच्या कार्यकर्त्यांनी लाचलुचत विभागावर नाराजी व्यक्त केली आहे. आता या अभियंत्यावर नेमकी कोणती कारवाई होते, हे पाहणं महत्वाचं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-बारामतीतून लढण्यावरून सुनेत्रा पवार स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, “उमेदवार म्हणून माझंच नाव…”
-पुणे काँग्रेमध्ये “लेटर बॉम्ब”चा झटका, लोकसभा उमेदवारीवरून आबा बागुलांचा इच्छुकांना दणका
-जानकर शरद पवारांच्या साथीला?; पवारांनी जानकरांसाठी सोडली माढाची जागा
-आढळराव पाटलांच्या उमेदवारीला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा विरोध; म्हणाले, ‘आयात…’