पुणे : ऐन लोकसभा निवडणुकीचा धामधुमीत बारामती लोकसभा महायुतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का देणारी बातमी पुढे आली आहे. कालपर्यंत त्यांच्या प्रचारात सक्रिय असणारे भोरमधील ठाकरेंच्या शिवसेनेतील नेते कुलदीप कोंडे यांनी ठाकरे गटाला राजीनामा देत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आयोजित सभेत कोंडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत दिसून आले.
काही दिवसांपूर्वी प्रचार करताना सुप्रिया सुळे यांनी भर सभेत विधानसभेला संग्राम थोपटे हे उमेदवार असतील आणि त्यांना पाठिंबा देण्याची घोषणा केली होती. यावरुन कुलदीप कोंडे यांनी नाराजी दर्शवली होती. सुप्रिया सुळे यांना कोंडेंची नाराजी दूर करण्यासाठी सभा सोडून भोरला जावं लागलं होतं. मात्र तरीही कोंडेंची नाराजी काही दूर झाली नाही. आज ते थेट अजित पवारांसोबत एका मंचावर दिसले आहे. यामुळे सुप्रिया सुळेंना यांना मोठा धक्का मानला जात आहे.
कालपर्यंत महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करणारे, सुप्रिया सुळेंचा प्रचारात सक्रिय असणारे आज अजित पवारांसोबत गेल्याने महाविकास आघाडीला याचा मोठा धक्का बसणार आहे. कारण कुलदीप कोंडे यांचे मुळशी, भोर, वेल्हे तालुक्यात मोठी ताकद आहे. ऐन निवडणुकीत कुलदीप कोंडे यांनी ठाकरे गटाला रामराम केला आहे. कुलदीप कोंडे यांनी २०१९ साली भोरमधून काँग्रेसचे संग्राम थोपटे यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढली होती.
महत्वाच्या बातम्या-
-Shirur Lok Sabha | शिरुरमध्ये ‘महागद्दार’वरुन दिलीप मोहिते अन् अमोल कोल्हेंच्यात चांगलीच जुंपली
-अजित पवार ‘कचाकचा’ शब्दावरुन झाले ट्रोल; स्पष्टीकरण देत म्हणाले, ‘मी ते वक्तव्य….’
-आयुष्यात सकारात्मक बदल करण्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांचा गुरुवारचा उपदेश नक्की वाचा…
-अभिजीत बिचुकले पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात; पहा कोणत्या मतदारसंघातून लढणार?