पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात पहिल्यांदा डॉक्टरांचा दबाव गट निर्माण होताना दिसत आहे. देशातील विविध उद्योग क्षेत्रात विविध संघटनांचा दबाव गट तयार करुन सरकारकडून मागण्या मान्य करुन घेत असतात. आपापल्या उद्योगांसाठी अनुकूल अशा सरकारी धोरणांचा आग्रह धरताना दिसतात. मोठमोठ्या उद्योजकांप्रमाणेच आता देशातील डॉक्टरांनी देखील असेच करायचे ठरवले आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. आर.व्ही. अशोकन यांनी याबाबत थेट भूमिका घेतली आहे.
‘कोरोना काळात मृत्यू झालेल्या डॉक्टरांचं साधं नावही सरकारणे घेणं टाळलं आहे. हे अतिशय लज्जास्पद आहे. डॉक्टरांनाच त्यांच्या मागण्यांसाठी आता उभं रहावं लागणार आहे. लोकशाही निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या मागण्या लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचविण्याची संधी डॉक्टरांना मिळाली आहे’, असं डॉ. आर. व्ही. अशोकन म्हणाले आहेत.
इंडियन मेडिकल असोसिएशनची प्रत्येक शाखा उमेदवारांपर्यंत पोहचून डॉक्टरांच्या मागण्या सादर केल्या जाणार आहेत. त्यामुळे उमेदवारीच्या टप्प्यापासूनच डॉक्टरांच्या मागण्यांची दखल घेणारा उमेदवार निवडून आल्यास तो डॉक्टरांच्या मागण्यांना व्यवस्थित न्याय देऊ शकतो, अशी यामागील इंडियन मेडिकल असोसिएशनची भूमिका आहे. अशा प्रकारे देशात डॉक्टरांचा दबाव गट तयार होणार असल्याचं पहायला मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘गुढीपाडवा’ सण का साजरा करावा? वाचा त्यामागचं नेमकं कारण
-आढळराव पाटलांना सर्वाधिक मताधिक्य जुन्नरमधून मिळेल! आमदार बेनकेंनी सांगितलं राजकीय गणित
-मोहोळांसाठी कसब्यात भाजपची मोर्चेबांधणी, ५० हजारांचे मताधिक्य देण्याचा रासनेंनी व्यक्त केला निर्धार
-पुण्यात भाजपचा विक्रम! एका दिवसात दहा लाख मतदारांपर्यंत पोहोचला ‘मोदींचा नमस्कार’
-सुप्रिया सुळेंना पाठिंबा न देणं मंगलदास बांदलांना पडलं महागात; वंचितकडून शिरुरची उमेदवारी रद्द