पुणे : संभाजी ब्रिगेडचे राज्यस्तरीय अधिवेशन नवी मुंबईतील कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारचे प्रमुख शरद पवार हे उपस्थित होते. यावेळी बोलताना शरद पवारांनी पुण्याचा इतिहास सांगताना म्हणाले की, ‘पुण्यातील मगरपट्टा येथे ऊसाची शेती होती’ शरद पवारांच्या या वक्तव्याची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे.
‘सतिश मगर आज येथे उपस्थित आहेत. आधी पुण्यातील मगर पट्टा येथे उसाची शेती होती. हळूहळू शहर वाढायला लागली ताशी शेती कमी व्हायला लागली. नागरीकरण वाढत होते हे लक्षात घेऊन सतिश मगर यांनी वेगळा निर्णय घेतला. त्यावेळी जमिनी विकण्याचा प्रकार मोठा होता’, असे शरद पवार म्हणाले आहेत.
‘सतिश मगर यांनी जमीन विकण्यापेक्षा नवीन शहर निर्माण करता येईल का याचा विचार केला आणि त्याठिकाणी शेतकऱ्यांना एकत्र करून आयटी नगरी निर्माण केली आहे. आज राज्यांतील देशातील मुलं येथे येतात आणि देशाच्या संपत्तीमध्ये कष्ट करून वाढ करतात. आज याठिकाणी असणाऱ्या तत्कालीन शेतकऱ्यांना जमिनी न विकल्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेत आहेत’, असे सांगत शरद पवारांनी पुण्याचा इतिहास सांगितला आहे.
महत्वाच्या बातम्या–
-पिंंपरी विधानसभेत ७ हजार बोगस मतदार? ‘या’ इच्छुकाचा अजित पवारांच्या आमदारावर गंभीर आरोप
-पैलवान गडी पण डोक्याने लैच हुशार, घरात सापडलं कोट्यवधींच घबाड; मंगलदास बांदलांचा इतिहास काय?
-MPSC: ‘विद्यार्थी नसलेले काँग्रेसची लोक आंदोलन पेटवत आहेत’; रुपाली पाटलांचा गंभीर आरोप
-Pune: मागणी पूर्ण तरीही एमपीएससीचे विद्यार्थी आंदोलनावर ठाम; नेमकं काय कारण?