पुणे : येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पिंपरी विधानसभा मतदारसंघातून बोगस मतदारांचा मुद्दा चांगलाच चर्चेचा ठरला आहे. एक-दोन नव्हे तर तब्बल ७ हजार बोगस मतदारांची नावे अंतिम यादीत असल्याचा दावा करण्यात आला आहे. हे बोगस मतदार एखाद्या उमेदवारास विजयी सुद्धा करु शकतात, असा दावा स्थायी समितीच्या माजी उपसभापती आणि विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवार सीमा सावळे यांनी केला आहे.
‘मला यादीमध्ये ७ हजार नावं सापडलं आहेत. या ७ हजार नावांमुळे निकाल बदलणार आहे. गेल्या वेळी भोसरी विधानसभा निवडणुकीमध्ये सुलभा उबाळे अवघ्या १२०० मतांनी पडल्या होत्या. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये अवघ्या ५-१० मतांनी देखील उमेदवार पडले आहेत. ७ हजार ही फार मोठी संख्या आहे’, असे सीमा सावळे म्हणाल्या आहेत.
‘जो सत्तेमध्ये असतो तो बोगस मताने वारंवार निवडून येतो. यांच्या आशिर्वादाशिवाय हे शक्य नाही. ७ हजार हा फार मोठा आकडा आहे. त्यामुळे निकाल बदलला जाऊ शकतो. यामुळे माझा यावर आक्षेप आहे. आण्णा बनसोडे इथे आमदार आहेत. माझ्या हे लक्षात आलं मग बनसोडेंच्या हे लक्षात आलं नाही का? हे त्यांच्याच आशिर्वादाने होऊ शकतं, असं म्हणत सीमा सावळे यांनी आमदार बनसोडेंवर निशाणा साधला आहे.
महत्वाच्या बातम्या–
-पैलवान गडी पण डोक्याने लैच हुशार, घरात सापडलं कोट्यवधींच घबाड; मंगलदास बांदलांचा इतिहास काय?
-MPSC: ‘विद्यार्थी नसलेले काँग्रेसची लोक आंदोलन पेटवत आहेत’; रुपाली पाटलांचा गंभीर आरोप
-Pune: मागणी पूर्ण तरीही एमपीएससीचे विद्यार्थी आंदोलनावर ठाम; नेमकं काय कारण?
-मोठी बातमी: हर्षवर्धन पाटलांनी तुतारी चिन्हावर लढण्याच्या चर्चेवर सोडलं मौन, म्हणाले…