पुणे : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची राज्य सेवा आयुक्त पूर्व परिक्षा आणि आयबीपीएस या दोन परिक्षा २५ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी आल्याने पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केले. त्यानंतर ही परिक्षा पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय लोकसेवा आयोगाच्या बैठकीत घेण्यात आला. विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य झाल्या तरीही आंदोलन मागे घेण्यात आले नाही. पुण्यात आंदोलनकर्ते विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. या सर्व प्रकरणाने राजकीय वळण घेतले. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला असून विरोधकांवर गंभीर आरोप केला आहे.
रूपाली ठोंबरे पाटील या आंदोलन स्थळी दाखल झाल्या होत्या. त्यांनी आंदोलकांशी संवाद साधला आणि सरकारला देखील विद्यार्थ्यांच्या मागणी मान्य करण्याची विनंती केली. त्यानंतर आयोगाचा निर्णय आल्यानंतर देखील आंदोलन सुरू पाहिल्यानंतर रुपाली ठोंबरे पाटील यांनी संताप व्यक्त केला.
‘आता एमपीएससी विद्यार्थी आंदोलनामध्ये पॉलिटिकल न्यूसन्स व्हायला लागला आहे. सुरुवातीपासून मी या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. विद्यार्थ्यांच्या प्रामुख्याने २ मागण्या होत्या. दोन्ही परीक्षा एकाच वेळेस आल्याने परीक्षा पुढे ढकलावी, ही मागणी विद्यार्थ्यांची होती. ती मागणी आम्ही सरकारपर्यंत पोहोचवली आणि आता आयोगाने याबाबतचे नोटिफिकेशन काढला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्या प्रमुख दोन मागण्या होत्या सरकारने आयोगाच्या मार्फत पूर्ण केल्या आहेत. सरकारने सर्व मागण्या पूर्ण केल्या एवढी अक्कल विद्यार्थ्यांना आहे. मात्र पॉलिटिकल लोकांना तेवढी अक्कल नसल्याने हे आंदोलन सुरू ठेवण्यात येत आहे’, असे म्हणत रुपाली पाटलांनी विरोधकांवर आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.
‘हे आंदोलन काँग्रेसकडून वेठीस धरण्यात येत आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना विचारल्यास ज्या कृषीच्या जागा आहेत त्या २०२४ मध्येच ऍड हव्यात ही त्यांची मागणी आहे. ती मागणी आता सरकारने मान्य केली आहे. त्या मागणीसाठी आम्ही विद्यार्थ्यांसोबत आहोत. आता या आंदोलनमध्ये जे विद्यार्थी नाहीत. ते सहभागी झाले. असून त्यामध्ये मला काँग्रेसचे लोक दिसत असून त्यांच्याकडून हे आंदोलन वेठीस धरण्यात येत आहे’, असा गंभीर आरोप रूपाली ठोंबरे पाटील यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या–
-Pune: मागणी पूर्ण तरीही एमपीएससीचे विद्यार्थी आंदोलनावर ठाम; नेमकं काय कारण?
-मोठी बातमी: हर्षवर्धन पाटलांनी तुतारी चिन्हावर लढण्याच्या चर्चेवर सोडलं मौन, म्हणाले…
-देशातील सर्व शाळा राजीव गांधी इ-लर्निंग सारख्या होवोत, सुप्रिया सुळेंनी केलं आबा बागुलांचे कौतुक