पुणे : आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आल्याने विद्यार्थ्यांची मोठी कोंडी झाली आहे. त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी मंगळवारपासून पुणे शहरात आंदोलनाला सुरुवात केली आहे. या आंदोलनाचे राजकीय पडसाद देखील उमटत आहे. एमपीएससी विद्यार्थ्यी २ दिवसांपासून रस्त्यावर उतरले असून त्यांच्यासाठी आता शरद पवारांनीही मैदानात उतरण्याचा इशारा सरकारला दिला आहे.
‘पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणं सरकारचं कर्तव्य आहे. परंतु सत्ताधारी याला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. यावर सरकारने योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर पुण्याच्या आंदोलनस्थळी मी स्वतः आंदोलनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार’, असे शरद पवारांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे.
पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणं सरकारचं कर्तव्य आहे. परंतु सत्ताधारी याला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. उद्यापर्यंत यावर सरकारने योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर पुण्याच्या आंदोलनस्थळी मी स्वतः आंदोलनात सहभागी…
— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 21, 2024
सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी आपली मागणी आंदोलनाच्या माध्यमातून मांडली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून खासदार सुप्रिया सुळे यांनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे. त्याशिवाय, भाजपकडूनही काही नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन याबाबत भूमिका मांडली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गुरुवारी महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत या मुद्द्यावर तोडगा निघण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
महत्वाच्या बातम्या–
-मोठी बातमी: हर्षवर्धन पाटलांनी तुतारी चिन्हावर लढण्याच्या चर्चेवर सोडलं मौन, म्हणाले…
-देशातील सर्व शाळा राजीव गांधी इ-लर्निंग सारख्या होवोत, सुप्रिया सुळेंनी केलं आबा बागुलांचे कौतुक
-भोसरी विधानसभेवरुन महाविकास आघाडीत मीठाचा खडा; महेश लांडगेंविरोधात कोण उतरणार निवडणुकीच्या रिंगणात?
-बदलापूर प्रकरणावरुन अजित पवारांनी राजीनामा द्यावा का? सुप्रिया सुळे म्हणाल्या…