पुणे : राजीव गांधी इ लर्निंग ही आदर्श शाळा असून देशातील सर्व सरकारी शाळा अश्या झाल्या पाहिजेत, संविधानाने दिलेले आपले हक्क व कर्तव्य याची जाण शिक्षण अवस्थेत असतानाच विद्यार्थ्यांना व्हावी तसेच मातृभाषेबद्दल जिव्हाळा वाढवा याकरिता आमचे सरकार येताच याचा अभ्यास अनिवार्य करणार असल्याच खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी ई- लर्निंग स्कुलच्या १३ व्या वर्षपूर्ती निमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी दिशादर्शक ठरलेल्या व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून सहकारनगरमध्ये पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून उभारलेल्या देशातील संगणक क्रांतीचे प्रणेते, माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी ई- लर्निंग स्कुलला १३ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित विशेष सोहळ्यात खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर माजी सनदी अधिकारी महेश झगडे, माजी आमदार उल्हास पवार, राष्ट्रवादी श प गटाचे अध्यक्ष प्रशांत जगताप, पुणे शहर कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष अरविंद शिंदे, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, अंकुश काकडे, कमलताई व्यवहारे अभय छाजेड, रामचंद्र उर्फ चंदू कदम,अविनाश बागवे, मुख्तार शेख,जयंत किराड,सौरभ अमराळे, जयश्रीताई बागुल,शिक्षांधिकारी आशा उबाळे, प्रिन्सिपल जामुवंत मसलकर,रुपाली कदम,अश्विनी ताटे आदी उपस्थित होते.
यावेळी खासदार सुळे म्हणाल्या कि, राजीव गांधी इ लर्निंग ही महानगरपालिकेची आदर्श शाळा आहे. समाजात वावरत असताना समता प्रस्थापित करण्यासाठी शिक्षणाची गरज असते, या शाळेतील विद्यार्थी नासामध्ये काम करत आहेत ही अभिमानाची बाब आहे. आबा बागुल यांच्या सारखे चांगले लोकप्रतिनिधी व सनदी अधिकारी यांनी एकत्र काम केल्यावर अश्या प्रकारची चांगली वस्तू तयार होते, याचे मूर्तिमंत उदाहरण ही शाळा आहे.
महत्वाच्या बातम्या–
-भोसरी विधानसभेवरुन महाविकास आघाडीत मीठाचा खडा; महेश लांडगेंविरोधात कोण उतरणार निवडणुकीच्या रिंगणात?
-बदलापूर प्रकरणावरुन अजित पवारांनी राजीनामा द्यावा का? सुप्रिया सुळे म्हणाल्या…
-मंगलदास बांदलांची वेळ खराब; १ कोटींचं घड्याळही गेलं अन् कोट्यावधींची मालमत्ताही, ईडीकडून अटक