पुणे : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांना मोठा धक्का दिला आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडत आहे.अनेक नेते पक्षांतर करत आहेत. अशात पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांचा बालेकिल्ल्यात मोठा धक्का बसला. त्यामुळे शहरात पुन्हा आपली ताकद वाढण्यासाठी अजित पवार शर्तीचे प्रयत्न करत असतानाच अजित पवारांना आणखी एक धक्का बसला आहे.
गेल्या २ वर्षांपासून अजित पवारांच्या संपर्कात असणारे माजी नगरसेवक रवि लांडगे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. दोन वर्षांपूर्वी भाजपचा राजीनामा दिल्यापासून रवि लांडगे अजित पवारांच्या संपर्कात होते. विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या लोकसभेत अजित पवारांच्या घड्याळाचा चांगलाच प्रचार केला. मात्र, ऐन विधानसभेच्या तोंडावर रवि लांडगे यांनी मोठी गिरकी घेतली.
अजित पवारांच्या संपर्कात असणाऱ्या रवि लांडगे यांनी आज शिवसेनेची मशाल हाती घेणार आहेत. महायुतीमध्ये भोसरी विधानसभेची जागा ही भाजपला सुटणार असल्याचे समजताच लांडगेंनी हाती मशाल घेण्याचा निर्णय घेतला. तसेच रवि लांडगे यांना महायुतीमध्ये तिकीट मिळणार नसल्याचेही बोलले जात होते. महाविकास आघाडीमध्ये तरी भोसरीची जागा ही शिवसेनेसाठी असेल का? आणि लांडगेंना उमेदवारी मिळेल का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पोर्शे कार अपघात प्रकरणी महत्वाची अपडेट; रक्ताचे नमुने बदल्यास मदत करणाऱ्या ‘त्या’ दोघांना अटक
-मराठा आरक्षणाबाबतच्या संभाजी भिडेंच्या वक्तव्यावरुन शरद पवारांनी काढली लायकी, नेमकं काय झालं?
-ऐन विधानसभेच्या तोंडावर महायुतीत राडा; जगदीश मुळीकांनी काढली अजित पवारांच्या आमदाराची पात्रता
-पुण्यात ट्रॉफिक पोलिसांचं अनोखं रक्षाबंधन; वाहन चालकांकडून ओवाळणी म्हणून घेतलं ‘हे’ महत्वाचं वचन
-सुप्रियाताई-अजितदादा रक्षाबंधन साजरा करणार का? अजित पवार म्हणाले, ‘तिच्याकडे…’