पुणे : शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संस्थापकचे संभाजी भिडे यांनी मराठा आरक्षणावरुन मांडलेल्या भूमिकेवरुन राज्यभरातून अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केले. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार आज पुण्यात असताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे.
“संभाजी भिडे हे काय कमेंट करण्याच्या लायकीचे आहेत का? काहीही प्रश्न विचारतात. म्हणून तुम्हाला भेटायचं नाही म्हणतो. हल्ली कसेही प्रश्न तुम्ही विचारतात, आपल्या लोकांचा दर्जा फार उतरलेला आहे. संभाजी भिडे आणि अमुक-तमुक…”, असे म्हणत शरद पवार यांनी संभाजी भिडे यांच्यावर विचारलेल्या प्रश्नावर बोलणं आणि प्रतिक्रिया देणं टाळल्याचे पाहायला मिळाले आहे.
संभाजी भिडे काय म्हणाले?
“मराठ्यांना उभा देश चालवायचा आहे. आरक्षण कुठे मागता? सिंहानी जंगल सांभाळायचे असते. मराठा जात ही संबंध देशाचा संसार चालविणारी जात आहे, हे मराठ्यांच्या ज्या दिवशी लक्षात येईल, त्यादिवशी या मातृभूमीचे भाग्य उजळून जाईल. हे त्यांच्या लक्षात येत नाही, हे आपले दुर्दैव आहे”, असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-ऐन विधानसभेच्या तोंडावर महायुतीत राडा; जगदीश मुळीकांनी काढली अजित पवारांच्या आमदाराची पात्रता
-पुण्यात ट्रॉफिक पोलिसांचं अनोखं रक्षाबंधन; वाहन चालकांकडून ओवाळणी म्हणून घेतलं ‘हे’ महत्वाचं वचन
-सुप्रियाताई-अजितदादा रक्षाबंधन साजरा करणार का? अजित पवार म्हणाले, ‘तिच्याकडे…’
-‘बारामतीतून निवडणूक लढविण्यात रस नाही’ अजितदादांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणाले, ‘जिथून…’
-कसब्यात आरोग्याचा महायज्ञ! तब्बल १२ हजार नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी