पुणे : येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तिन्ही नेते राज्यभरात फिरुन राज्य सरकारच्या योजनांचा जोरदार प्रचार करत आहेत. एकीकडे वरिष्ठ पातळीवर जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत, तर दुसरीकडे स्थानिक पातळीवर महायुतीच्या नेत्यांमध्ये वाद असल्याचे दिसून आले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्याला भाजप कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे दाखवल्याबाबत अमोल मिटकरी यांनी ट्वीट करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाहीर खुसाला मागितला होता. मिटकरींच्या या मागणीवर भाजपच्या जगदीश मुळीक यांनी प्रत्युत्तर अमोल मिटकरी यांना चांगलेच खडसावले आहे. जगदीश मुळीक यांनी अमोल मिटकरींना टीकेचे लक्ष्य केले आहे.
ए मिटकरी, तुझी पात्रता आहे का? मा. देवेंद्रजींना खुलासा मागण्याची?
शेवटी तू बाजारु विचारजंतच, तुझी पात्रता तेवढ्याच डबक्यात राहणार !@Dev_Fadnavis pic.twitter.com/WLnw8eeOo0
— Jagdish Mulik (@jagdishmulikbjp) August 18, 2024
‘ए मिटकरी, तुझी पात्रता आहे का? मा. देवेंद्रजींना खुलासा मागण्याची? शेवटी तू बाजारु विचारजंतच, तुझी पात्रता तेवढ्याच डबक्यात राहणार’, अशी टीका जगदीश मुळीक यांनी केली आहे. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि अमोल मिटकरी यांच्याकडून काय प्रतक्रिया येते हे पाहणे महत्वाचे आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात ट्रॉफिक पोलिसांचं अनोखं रक्षाबंधन; वाहन चालकांकडून ओवाळणी म्हणून घेतलं ‘हे’ महत्वाचं वचन
-सुप्रियाताई-अजितदादा रक्षाबंधन साजरा करणार का? अजित पवार म्हणाले, ‘तिच्याकडे…’
-‘बारामतीतून निवडणूक लढविण्यात रस नाही’ अजितदादांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणाले, ‘जिथून…’
-कसब्यात आरोग्याचा महायज्ञ! तब्बल १२ हजार नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी
-‘माझा फोन हॅक झालाय’; सुप्रिया सुळेंच्या मोबाईल हॅकने राजकीय वर्तुळात खळबळ