पुणे : आज देशभरात रक्षाबंधन साजरा केला जात आहे. अशातच पुणे शहरामध्ये देखील अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरा केला जात आहे. पुणे शहरातील महिला ट्राफिक पोलिसांनी सीट बेल्ट न घालणाऱ्यांना ओरडण्या ऐवजी आता सुरक्षेची राखी बांधली आहे. शहरात सध्या वाहतूक कोंडींची समस्या भेडसावत आहे. त्यातच वाहतूकीचे नियम मोडणाऱ्यांची देखील संख्या काही कमी नाही. ट्राफिक सिग्नल तोडल्याने होणाऱ्या अपघाताचे प्रमाणही वाढतच आहे. यावर पुणे वाहतूक पोलिसांनी शक्कल लढवत हा उपक्रम राबवला आहे.
वाहतूक पोलिसांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत रक्षाबंधनाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. शहरात वाढत चाललेल्या अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला असून याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. एरव्ही नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात येते.
View this post on Instagram
इतर वेळी पावती फाडणाऱ्या याच महिला ट्रॉफिक पोलीस चक्क सीटबेल्टचे महत्व समाजवून सांगत सीटबेल्ट सारखी दिसणारी राखी बांधताना दिसत आहेत. विशेष म्हणजे सीट बेल्ट सारखी दिसणारी राखी बांधल्यानंतर ओवाळणी म्हणून आयुष्यभर सीट बेल्ट घालून प्रवास करेन असे वचन देखील या महिला ट्रफिक पोलिसांनी वाहन चालक भावांकडून घेतले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-सुप्रियाताई-अजितदादा रक्षाबंधन साजरा करणार का? अजित पवार म्हणाले, ‘तिच्याकडे…’
-‘बारामतीतून निवडणूक लढविण्यात रस नाही’ अजितदादांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणाले, ‘जिथून…’
-कसब्यात आरोग्याचा महायज्ञ! तब्बल १२ हजार नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी
-‘माझा फोन हॅक झालाय’; सुप्रिया सुळेंच्या मोबाईल हॅकने राजकीय वर्तुळात खळबळ
-मोठी बातमी: मालेगावात अजित पवारांच्या जीवाला धोका; गुप्तचर विभागाची माहिती