पुणे : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लडण्यात कोणताही रस नाही, असे वक्तव्य केले होते. अजित पवारांच्या या वक्तव्यावर राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात आले. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारचे प्रमुख शरद पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार हे पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
काय म्हणाले शरद पवार?
“सार्वजनिक जीवनात किंवा राजकारणात निवडणुकीला सामोरे जाण्याची भूमिका त्यांनी बजावलेली असते. त्यांना आपला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. जिथे अनुकूल वातावरण वाटायला लागते, तिथे जनरली, असं करतात. अजित पवार यांच्या मनात नक्की काय आहे? मला माहिती नाही”, असे शरद पवार म्हणाले आहेत.
“य़ेत्या विधानसभेत मला निवडणूक लडण्यात कोणताही रस नाही. स्थानिक कार्यकर्त्यांची मागणी असेल आणि पक्षाच्या संसदीय समितीचा निर्णय असेल तर जय यांना उमेदवारी मिळू शकते,” असे अजित पवार म्हणाले होते. अजित पवारांच्या या वक्तव्यावरुन राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. आता या निवडणुकीत बारामतीमधून अजित पवार लढवणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-कसब्यात आरोग्याचा महायज्ञ! तब्बल १२ हजार नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी
-‘माझा फोन हॅक झालाय’; सुप्रिया सुळेंच्या मोबाईल हॅकने राजकीय वर्तुळात खळबळ
-मोठी बातमी: मालेगावात अजित पवारांच्या जीवाला धोका; गुप्तचर विभागाची माहिती
-Big Boss Marathi: सुरज चव्हाणच्या ‘झापूक झुपूक’वर अक्षय कुमारही थिरकला
-‘माझा फोन हॅक झालाय’; सुप्रिया सुळेंच्या मोबाईल हॅकने राजकीय वर्तुळात खळबळ